• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जन सुरक्षा कायद्याविरोधात जळगाव ग्रामीण काँग्रेसचे तीव्र आंदोलन

जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 19, 2025
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
जन सुरक्षा कायद्याविरोधात जळगाव ग्रामीण काँग्रेसचे तीव्र आंदोलन

जळगाव, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधानसभेने महायुती सरकारने बहुमताच्या जोरावर मंजूर केलेल्या ‘जन सुरक्षा कायदा २०२४’ विरोधात जळगाव जिल्हा ग्रामीण काँग्रेसने १९ जुलै ला तीव्र निषेध आंदोलन केले. या कायद्यामुळे संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांवर गदा येईल, असा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती माळी यांना निवेदन सादर करण्यात आले.

जिल्हा ग्रामीण काँग्रेसने म्हटले आहे की, हे विधेयक महाराष्ट्रात लागू झाले, तर संविधानातील मूलभूत अधिकारांचा गळा घोटला जाईल. सरकारच्या असंवैधानिक ध्येय-धोरणांविरोधात विरोधी पक्ष, संघटना, तसेच न्यायासाठी संविधानिक मार्गाने रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना चौकशीविना तुरुंगात टाकण्याचा अधिकार या कायद्याने सरकारला मिळणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात जिल्हा काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. या प्रसंगी जिल्हा सेक्रेटरी जमील शेख, हमीद शेख, सचिन सोमवंशी, डॉ. जगदीश पाटील, बी.के. सूर्यवंशी, मनोज पाटील, तुषार संदाशिव, गजेंद्र साळुंखे, सुलोचना वाघ, ऐश्वर्या राठोड, शरद पाटील, रतिलाल महाजन, दिलीप शेंडे, सुनील पाटील, विजय महाजन, आशुतोष पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा काँग्रेस कार्यालयाच्या आवारात आंदोलन संपल्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती माळी यांना निवेदन दिले.

Next Post
पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी: अट्टल चोरटे जेरबंद, लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत!

पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी: अट्टल चोरटे जेरबंद, लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत!

ताज्या बातम्या

गसच्या सभासदांची कर्जमर्यादा ५ लाखांनी वाढवली
गुन्हे

गसच्या सभासदांची कर्जमर्यादा ५ लाखांनी वाढवली

September 13, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

September 13, 2026
दिनकरनगरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
गुन्हे

दिनकरनगरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

September 13, 2026
सावदा येथे रंगणार २७ सप्टेंबरला भुलाबाई महोत्सव
जळगाव जिल्हा

सावदा येथे रंगणार २७ सप्टेंबरला भुलाबाई महोत्सव

September 13, 2026
सुप्रीम इंडस्ट्रीजला गोदावरी आयएमआर व डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट
खान्देश

सुप्रीम इंडस्ट्रीजला गोदावरी आयएमआर व डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट

September 12, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न
कृषी

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न

September 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add