जळगाव, (प्रतिनिधी) : इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्टचा पदग्रहण सोहळा नुकताच गणपती नगरातील रोटरी हॉल येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात सिमरन पाटील यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला, तर रितू शर्मा यांच्याकडे सचिवपदाची सूत्रे सोपवण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून डिस्ट्रिक्ट चेअरमन रमा गर्ग, इंटरनॅशनल इनरव्हील ट्रेझरर रश्मी शर्मा, आणि डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट कमिटी चेअर पीडीसी संगीता घोडगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
क्लबच्या वार्षिक सभेत नवीन पदधारक आणि कार्यकारी समितीच्या अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली होती. यामध्ये नेहल कोठारी यांनी ट्रेझरर म्हणून, रिटा भल्ला यांनी आयएसओ म्हणून, आणि सुलभा लढ्ढा यांनी सीसी म्हणून पदभार स्वीकारला. याव्यतिरिक्त, कार्यकारी समितीच्या इतर सदस्यांनीही पुढील वर्षभराच्या कार्यकाळासाठी आपल्या पदांची सूत्रे हाती घेतली.
कार्यक्रमादरम्यान, डिस्ट्रिक्ट चेअरमन रमा गर्ग यांनी सदस्यांना डिस्ट्रिक्ट गोलनुसार वर्षभर विविध उपक्रम राबवण्याचे आवाहन केले. इंटरनॅशनल इनरव्हील ट्रेझरर रश्मी शर्मा यांनी क्लबच्या आतापर्यंतच्या वाटचालीबद्दल आणि यशस्वी उपक्रमांबद्दल सदस्यांचे कौतुक केले. पीडीसी संगीता घोडगावकर यांनी क्लबच्या भविष्यातील उपक्रमांविषयी माहिती दिली. यावेळी क्लबच्या आगामी उपक्रमांवर आणि योजनांवर सविस्तर चर्चा झाली आणि पुढील वाटचालीची रूपरेषा निश्चित करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार भाग्यश्री शर्मा यांनी मानले.