• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बहिणाबाईंच्या काव्याने भावांजली महोत्सवाची सुरवात

भाऊंच्या कार्याला परिवर्तनच्या कलावंतांचे नमन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 14, 2021
in मनोरंजन
0
बहिणाबाईंच्या काव्याने भावांजली महोत्सवाची सुरवात

जळगाव, दि. 14 – बहिणाबाईंच्या कवितेने व गीतांनी परिवर्तनच्या “अरे संसार संसार” कार्यक्रमाने भावांजली महोत्सवाला सुरवात झाली. संजिवनी फाऊंडेशन संचलित परिवर्तनतर्फे पद्मश्री भवरलाल जैन यांना आदरांजली देणारा आठ दिवसीय ‘भावांजली महोत्सवा’चे उद्घाटन भाऊंच्या उद्यानातील ऍम्फि थिएटरमध्ये करण्यात आले.

याप्रसंगी सुप्रसिद्ध उर्दू व मराठी गजलकार व राज्याचे माहिती व जनसंपर्क महासंचालक डॉ दिलीप पांढरपट्टे, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, माजी मंत्री गुलाबराव देवकर, भालचंद्र पाटील, जे के चव्हाण, डॉ राधेशाम चौधरी, सिद्धार्थ बाफना यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मनोज पाटील यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी महोत्सव प्रमुख अनिश शहा, अमर कुकरेजा, अनिल कांकरिया, छबिलदास राणे , डॉ रणजित चव्हाण, किरण बच्छाव, नारायण बाविस्कर, राहुल निंबाळकर हे महोत्सव प्रमुख उपस्थित होते.

बहिणाबाईंच्या कवितांवर आधारित ‘अरे संसार संसार’ हा सांगितिक कार्यक्रमात माहेर, अरे संसार संसार, माही माय सरसोती, सुगरीणीचा खोपा, आखाजी अशी अनेक गाणी परिवर्तनच्या कलावंतांनी सादर केली. सुदिप्ता सरकार, श्रद्धा पुराणिक कुलकर्णी, हर्षदा कोल्हटकर यांनी आपल्या मधुर आवाजात गाणी गायली. बहिणाईच्या कविता नारायण बाविस्कर, मंजुषा भिडे, प्रतिक्षा कल्पराज, मंगेश कुलकर्णी, उर्जा सपकाळे, सद्धी शिसोदे, सोनाली पाटील यांनी सादर केल्या तर तर मनीष गुरव, योगेश पाटील, बुद्धभूषण मोरे, सुयोग गुरव, चंद्रकांत इंगळे यांनी सहभाग घेतला.

बहिणाबाईच्या कवितेची निर्मितीप्रक्रिया, त्यातील गोडवा, बोलीभाषेतील सौंदर्य, जळगावची संस्कृती आणि कवितेतील तत्वज्ञान शंभू पाटील यांनी उलगडून दाखवले. परिवर्तनची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्रभर मागणी आहे.

कृषीधनाने महोत्सवाचे उद्घाटन

कृषी परंपरेशी भवरलाल जैन यांचं अतुट नातं होतं. आणि याच कृषीजनसंस्कृतीमधील वस्तूंना हाती घेत भाऊंना भावांजली महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. यात कापुस, केळीचे खांब व घड, धान्याचे कणीस, पांभरी, कुदळ, पावडी, विळा हे कृषीधन मान्यवरांच्या हाती देऊन या धनाला वंदन करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात बुद्धभूषण मोरे यांनी भवानी आईचा गोंधळ सादर करून करण्यात आले.
महोत्सवाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद होता. जागे अभावी अनेकांना परत जावे लागले.


 

Next Post
चाळीसगाव-धुळे मेमू रेल्वे सेवेला सुरुवात

चाळीसगाव-धुळे मेमू रेल्वे सेवेला सुरुवात

ताज्या बातम्या

राष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्राचा दबदबा; जळगावात पटकावले विजेतेपद
क्रिडा

राष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्राचा दबदबा; जळगावात पटकावले विजेतेपद

January 20, 2026
जळगाव मनपा निवडणूक : मतमोजणी प्रक्रियेवर संशय; सीसीटीव्ही फुटेजसह फेरमतमोजणीची माहिती देण्याची मागणी
Uncategorized

जळगाव मनपा निवडणूक : मतमोजणी प्रक्रियेवर संशय; सीसीटीव्ही फुटेजसह फेरमतमोजणीची माहिती देण्याची मागणी

January 20, 2026
जळगावात ‘रामानंद’ हद्दीत कुंटणखान्यावर छापा; दोन परप्रांतीयांसह ४ महिलांची सुटका
खान्देश

जळगावात ‘रामानंद’ हद्दीत कुंटणखान्यावर छापा; दोन परप्रांतीयांसह ४ महिलांची सुटका

January 20, 2026
राज्यातील २९ महापालिकांच्या महापौर आरक्षणाची सोडत २२ जानेवारीला; मंत्रालयात रंगणार ‘आरक्षण’ नाट्य
खान्देश

राज्यातील २९ महापालिकांच्या महापौर आरक्षणाची सोडत २२ जानेवारीला; मंत्रालयात रंगणार ‘आरक्षण’ नाट्य

January 19, 2026
जिल्हा परिषदेच्या ४ कर्मचाऱ्यांचे निलंबन; दिव्यांग प्रमाणपत्रात आढळली तफावत
खान्देश

जिल्हा परिषदेच्या ४ कर्मचाऱ्यांचे निलंबन; दिव्यांग प्रमाणपत्रात आढळली तफावत

January 19, 2026
जैन इरिगेशनच्या कृषी महोत्सवास शेतकऱ्यांचा प्रतिसाद
कृषी

जैन इरिगेशनच्या कृषी महोत्सवास शेतकऱ्यांचा प्रतिसाद

January 19, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group