• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ग्रामसेवक आणि रोजगार सेवक लाच घेताना रंगेहात जेरबंद; घरकुल हप्त्यासाठी मागितली लाच

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 23, 2025
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
ग्रामसेवक आणि रोजगार सेवक लाच घेताना रंगेहात जेरबंद; घरकुल हप्त्यासाठी मागितली लाच

जळगाव, (प्रतिनिधी) : घरकुलाचा दुसरा हप्ता मिळवून देण्यासाठी आणि गट नंबर नमुना आठ देण्यासाठी सहा हजार रुपयांची लाच मागणाऱ्या ग्रामसेवकासह एका रोजगार सेवकाला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी २३ जून रोजी रंगेहात पकडले. मांडकी, ता. भडगाव येथील रहिवासी असलेल्या ३५ वर्षीय तक्रारदाराकडून ५ हजार रुपये स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली.

काय आहे प्रकरण?
मांडकी, ता. भडगाव येथील एका व्यक्तीला मंजूर झालेल्या घरकुलाचा दुसरा हप्ता मिळावा यासाठी तसेच गट नंबर नमुना आठ मिळवण्यासाठी ग्रामसेवक सोनिराम धनराज शिरसाठ (वय ४७, रा. पाचोरा, जि. जळगाव) आणि रोजगार सेवक जितेंद्र लक्ष्मण चौधरी (वय ३८, रा. पाचोरा, जि. जळगाव) यांनी ६ हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने २३ जून २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

सापळा रचून केली कारवाई..
तक्रार मिळाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, आरोपींनी ६ हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती ५ हजार रुपये लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार, २३ जून २०२५ रोजी सापळा रचण्यात आला. या सापळा कारवाईदरम्यान, आरोपी ग्रामसेवक सोनिराम शिरसाठ आणि रोजगार सेवक जितेंद्र चौधरी यांनी पंचांसमक्ष ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याकडून लाचेची रक्कम ५ हजार रुपये हस्तगत करण्यात आली आहे. आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ला.प्र.विभागाच्या नाशिक परिक्षेत्र, पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाईचे पर्यवेक्षण पोलिस उप अधीक्षक योगेश ठाकूर (ला.प्र.वि. जळगाव) यांनी केले. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी (नंदुरबार) आणि तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव (जळगाव) यांनी काम पाहिले. सापळा पथकात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिनेश सिंग पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास पाटील, पोलीस नाईक हेमंत पाटील, पोलीस नाईक सुभाष पावरा यांचा सहभाग होता.

 


Tags: #corruption#pachoraBhadgaonCrime
Next Post
दहावी-बारावीच्या १,२०७ विद्यार्थ्यांची परीक्षा २४ जूनपासून

दहावी-बारावीच्या १,२०७ विद्यार्थ्यांची परीक्षा २४ जूनपासून

ताज्या बातम्या

ऑनलाईन टास्कच्या नावाखाली साडेतीन लाखांची फसवणूक!
खान्देश

ऑनलाईन टास्कच्या नावाखाली साडेतीन लाखांची फसवणूक!

November 8, 2025
जळगावला राज्यात सर्वाधिक थंडीचा तडाखा! दोन दिवसांत पारा थेट ९ अंशांनी घसरला
खान्देश

जळगावला राज्यात सर्वाधिक थंडीचा तडाखा! दोन दिवसांत पारा थेट ९ अंशांनी घसरला

November 8, 2025
जळगाव पोलिसांची ‘ऑल आऊट’ धडक मोहीम
खान्देश

जळगाव पोलिसांची ‘ऑल आऊट’ धडक मोहीम

November 7, 2025
कुंटणखाण्यावर पोलिसांची धाड, ५ तरुणींची सुटका; ग्राहकांसह मालकांवर गुन्हा दाखल!
खान्देश

कुंटणखाण्यावर पोलिसांची धाड, ५ तरुणींची सुटका; ग्राहकांसह मालकांवर गुन्हा दाखल!

November 7, 2025
१३३ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर
जळगाव जिल्हा

१३३ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर

November 6, 2025
जळगावच्या रंगभूमीच्या विकासासाठी सदैव मदत करणार – आ. राजूमामा भोळे
खान्देश

जळगावच्या रंगभूमीच्या विकासासाठी सदैव मदत करणार – आ. राजूमामा भोळे

November 6, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group