• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विनयभंगाचा जाब विचारणाऱ्या नातेवाईकावर चाकूहल्ला ; दापोऱ्यात एक गंभीर जखमी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 24, 2025
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
विनयभंगाचा जाब विचारणाऱ्या नातेवाईकावर चाकूहल्ला ; दापोऱ्यात एक गंभीर जखमी

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव तालुक्यातील दापोरा गावात विनयभंगाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणीच्या नातेवाईकावर चाकूहल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुणीचा मामा गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दापोरा येथील एक कुटुंब रात्री आपल्या घराच्या गच्चीवर झोपले होते. त्यावेळी कुटुंबातील तरुणीने आरडाओरडा केल्याने सर्वांना जाग आली. तेव्हा संशयित आरोपी विनोद अरुण सोनवणे घटनास्थळावरून पळून जाताना दिसला. झोपेत असताना कोणीतरी आपल्या पायाला स्पर्श करत असल्याचे जाणवल्याने जाग आली असता विनोद सोनवणे पायाजवळ उभा असल्याचे तरुणीने सांगितले.

या घटनेनंतर, पीडित तरुणीचे कुटुंबीय विनोद सोनवणे याच्या घरी जाब विचारण्यासाठी गेले. त्यावेळी विनोदने त्यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. कुटुंबातील इतर सदस्य मदतीला धावले असता, विनोदने घरातून चाकूसारखे धारदार हत्यार आणले आणि तरुणीच्या मामाच्या पोटात खुपसले. तसेच, त्याच्या उजव्या खांद्यावरही वार केले.

या हल्ल्यात मामा गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आरोपी विनोद सोनवणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Tags: Crime
Next Post
चोपड्यात भरधाव रिक्षा उलटली ; एक ठार, तिघे जखमी

चोपड्यात भरधाव रिक्षा उलटली ; एक ठार, तिघे जखमी

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add