• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीचे दोनदा बळजबरीने लग्न ; इच्छेविरुद्ध ठेवले शारीरिक संबंध

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 24, 2025
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
अल्पवयीन मुलीचे दोनदा बळजबरीने लग्न ; इच्छेविरुद्ध ठेवले शारीरिक संबंध

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिथे एका अल्पवयीन मुलीशी दोनदा बळजबरीने लग्न लावून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवण्यात आले. या गंभीर घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत ९ संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती आरोपींना होती. असे असतानाही, त्यांनी संगनमत करून तिचे दोन वेगवेगळ्या व्यक्तींशी दोन वेळा लग्न लावले. विशेष म्हणजे, या दोन्ही लग्नांना मुलीची आई आणि भाऊ यांच्यासह इतरही संशयित आरोपी उपस्थित होते. लग्नानंतर दोन आरोपींनी पीडित अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले, तर काहींनी तसा प्रयत्न केला.

या गंभीर तक्रारीची दखल घेत नशिराबाद पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ए. सी. मनोरे यांनी तातडीने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विजय कोळी करत आहेत. या घटनेमुळे समाजात संतापाची लाट उसळली असून, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

Next Post
विनयभंगाचा जाब विचारणाऱ्या नातेवाईकावर चाकूहल्ला ; दापोऱ्यात एक गंभीर जखमी

विनयभंगाचा जाब विचारणाऱ्या नातेवाईकावर चाकूहल्ला ; दापोऱ्यात एक गंभीर जखमी

ताज्या बातम्या

जळगाव एम.आय.डी.सी. पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्ट्यासह एक तरुण जेरबंद
गुन्हे

जळगाव एम.आय.डी.सी. पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्ट्यासह एक तरुण जेरबंद

June 30, 2026
‘एक भारत.. एक सुर’ कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश
जळगाव जिल्हा

‘एक भारत.. एक सुर’ कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश

June 30, 2026
तरुणांमध्ये हार पचविण्याची क्षमता हवी : कृष्णराज महाडिक
जळगाव जिल्हा

तरुणांमध्ये हार पचविण्याची क्षमता हवी : कृष्णराज महाडिक

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य
क्रिडा

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 30, 2026
डॉ. उमाकांत चौधरी यांचा गोल्ड मेडल अवॉर्डने गौरव
जळगाव जिल्हा

डॉ. उमाकांत चौधरी यांचा गोल्ड मेडल अवॉर्डने गौरव

June 30, 2026
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर
जळगाव जिल्हा

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर

June 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group