• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

नातवाला कॉलेजला घेऊन जाणाऱ्या आजोबांचा अपघाती मृत्यू, नातू गंभीर जखमी

यावल तालुक्यातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 22, 2025
in जळगाव जिल्हा
0
नातवाला कॉलेजला घेऊन जाणाऱ्या आजोबांचा अपघाती मृत्यू, नातू गंभीर जखमी

यावल, (प्रतिनिधी) : तालुक्यातील आडगाव येथून १६ वर्षीय नातवासोबत ७० वर्षीय वृद्ध आजोबा चिंचोली येथे दहावीनंतर पुढील प्रवेशाबाबत माहिती घेण्यासाठी दुचाकीवर जात असताना दुचाकीला चिंचोली गावाजवळील आडगाव फाट्याजवळ पिकअप वाहनाने भीषण धडक दिली. या अपघातामध्ये आजोबा जागीच ठार झाले तर नातू हा गंभीर जखमी झाला आहे. यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुभाष बाबुराव पाटील (वय ७०, रा.आडगाव, ता.यावल) असे मयत आजोबांचे नाव आहे. आडगाव येथे परिवारासह ते राहत होते. त्यांचा नातू कल्पेश उत्तम पाटील हा नुकताच दहावी परीक्षा उत्तीर्ण झाला होता. त्यामुळे मंगळवारी दि. २० मे रोजी दुचाकी (क्र. एम.एच.०४ बी. एक्स.४५६८) द्वारे सुभाष पाटील हे नातू कल्पेश उत्तम पाटील याला घेऊन चिंचोली येथील विद्यालयात पुढील प्रवेशाची माहिती घेण्यासाठी जात होते. चिंचोली गावाजवळील आडगाव फाट्यापासून काही अंतरावर त्यांच्या दुचाकीला पीकअप वाहन (क्र. एम. एच.०४ के.एफ. ८४४०) वरील अज्ञात चालकाने धडक दिली. या अपघातामध्ये सुभाष पाटील हे जागीच ठार झाले तर कल्पेश पाटील याला गंभीर दुखापत झाली.

अपघाताची माहिती मिळताच तातडीने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावल पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक मकसूद शेख, हवालदार संदीप सूर्यवंशी हे पथकासह दाखल झाले. तत्पुर्वी जखमी अवस्थेतील कल्पेश पाटील याला जळगाव येहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवले तर मयत सुभाष पाटील यांचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. अपघात प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात वासुदेव बाबुराव पाटील यांच्या फिर्यादीवरून पिकअप वाहनावरील अज्ञात चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. नातवाची प्रकृती गंभीर आहे. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मक्सुद शेख, हवालदार संदीप सूर्यवंशी करीत आहे.

Tags: accident
Next Post
दोन लाखांचे मोबाईल चोरणारा अल्पवयीन २४ तासांत जेरबंद ; एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

दोन लाखांचे मोबाईल चोरणारा अल्पवयीन २४ तासांत जेरबंद ; एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

ताज्या बातम्या

अमळनेरच्या तीन महिन्यांच्या बालिकेला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार!
आरोग्य

अमळनेरच्या तीन महिन्यांच्या बालिकेला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार!

June 2, 2026
वेस्ट टू एनर्जी: डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या ‘अन्नपुर्णालयम’मध्ये कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती!
जळगाव जिल्हा

वेस्ट टू एनर्जी: डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या ‘अन्नपुर्णालयम’मध्ये कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती!

June 2, 2026
भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी
जळगाव जिल्हा

भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी

June 2, 2026
जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर
जळगाव जिल्हा

जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर

June 1, 2026
मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा

मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा

May 31, 2026
जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण
कृषी

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण

May 31, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group