• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जि.पच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी नागरिकांना साधता येणार थेट संवाद

जिल्हा परिषदेच्या सीईओंचा उपक्रम

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 15, 2025
in जळगाव जिल्हा
0
व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जि.पच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी नागरिकांना साधता येणार थेट संवाद

जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आता नागरिकांना दररोज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधता येणार आहे. दरम्यान नागरिकांशी संवाद या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांचे हस्ते १४ मे बुधवार रोजी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधून करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल यांनी स्वत: तक्रारदारांशी संवाद साधून त्यांची समस्या जाणून घेतली. ही योजना घोषित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी अनेकांनी या योजनेला प्रतिसाद दिला.

नागरिक, ग्रामस्थ यांना त्यांच्या अडचणी, तक्रारी किंवा सूचना थेट प्रशासनापर्यंत पोहोचवण्याची सुविधा उपलब्ध करून देऊन नागरिकांना जिल्हा परिषद कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची गरज भासू नये तर घरबसल्या त्यांना प्रशासनाशी संवाद साधया यावा असा या योजने मागचा मूळ उद्देश आहे.यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने झूम ॲपच्या माध्यमातून क्यू आर कोड व लिंक उपलब्ध करून दिली आहे. उपलब्ध करून दिलेला क्यू आर कोड सबंधित तक्रारदाराने स्कॅन केल्यानंतर तक्रारदाराला थेट जिल्हा परिषद प्रशासनाशी संवाद साधता येणार आहे. सोमवार ते शुक्रवार कार्यालयीन दिवशी सकाळी १०.३० ते ११.३० या कालावधीत संपर्क साधता येईल. बुधवार दि. १४ रोजी उद्घाटन प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर.एस लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, भाऊसाहेब अकलाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांचेसह जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख व अधिकारी उपस्थित होते.

Next Post
जैन इरिगेशन सिस्टीम्सला एकत्रित करपश्चात २५.७ कोटींचा नफा

जैन इरिगेशन सिस्टीम्सला एकत्रित करपश्चात २५.७ कोटींचा नफा

ताज्या बातम्या

सावधान! बालविवाहाचा प्रयत्न पडेल महागात; जळगाव प्रशासन ‘अलर्ट’
जळगाव जिल्हा

सावधान! बालविवाहाचा प्रयत्न पडेल महागात; जळगाव प्रशासन ‘अलर्ट’

April 18, 2026
लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी
गुन्हे

लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी

April 17, 2026
जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न
क्रिडा

जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न

April 16, 2026
जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप
जळगाव जिल्हा

जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप

April 16, 2026
जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश

April 16, 2026
जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा
जळगाव जिल्हा

जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा

April 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group