• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कार अपघातात पिता ठार, मुलीसह दोघे जखमी ; जळगावच्या रामेश्वर कॉलनीत शोककळा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 10, 2025
in जळगाव जिल्हा
0
कार अपघातात पिता ठार, मुलीसह दोघे जखमी ; जळगावच्या रामेश्वर कॉलनीत शोककळा

जळगाव, (प्रतिनिधी) : अमळनेर येथून मुलीच्या परीक्षेचा पेपर देऊन जळगाव शहरात परत येत असताना धरणगाव तालुक्यातील पिंप्रिं येथे भरधाव बोलेरोने स्विफ्ट कारला दिलेल्या भीषण धडकेत कारमधील पित्याचा मृत्यू झाला आहे. तर मुलीसह आणखी एक जण गंभीर जखमी झाले आहेत. शासकीय रुग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता.

महेश सुरेश सोनार (वय ४५, जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ते रामेश्वर कॉलनी मध्ये पत्नी, दोन मुली यांच्यासह राहत होते. पाणी जारचा व्यवसाय करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान, महेश सोनार यांची मोठी मुलगी नयना सोनार हिचा एमबीए सिईटीचा पेपर असल्यामुळे त्यांना अमळनेर येथे जायचे होते. सकाळी कारने अमळनेर येथे सिईटीचा पेपर देण्यासाठी मुलगी नयना सोनार आणि राजेश मिठूलाल धूत (वय ४६, रा. दौलत नगर, जळगाव) यांच्यासह अमळनेर येथे गेले होते. परीक्षा आटोपून परतताना दुपारी दीड वाजता धरणगाव तालुक्यातील पिंप्रिं गावाजवळ त्यांच्या स्विफ्ट कारला भरधाव बोलेरो वाहनाने जबर धडक दिली.

या धडकेत गंभीर जखमी तिघांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.रुग्णालयात महेश सुरेश सोनार यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. तर जखमी राजेश मिठूलाल धूत आणि नयना महेश सोनार यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. रुग्णालयामध्ये महेश सोनार यांच्या नातेवाईक व मित्रपरिवार यांनी प्रचंड आक्रोश केला. घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. तर मयत महेश सोनार यांच्या मृत्यूमुळे जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी येथे शोककळा पसरली आहे.

Tags: accident
Next Post
आरोग्य सेवकांच्या पदोन्नतीचा प्रश्न सुटला, २१ जणांना सहाय्यकपदी नियुक्ती

आरोग्य सेवकांच्या पदोन्नतीचा प्रश्न सुटला, २१ जणांना सहाय्यकपदी नियुक्ती

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add