यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील साकळी शिवारामध्ये एका मजुराने शेताच्या बांधावरील झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी दि. २७ एप्रिल रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मानसिंग जवानसिंग भिलाला (वय ५०, रा. शिरसाठ ता. यावल) असे मयत इसमाचे नाव आहे. तो परिवारासह गावात राहत होता. रविवारी सकाळी साकळी गावाच्या शिवारात ईश्वर लोधी यांच्या शेताच्या बांधावरील निंबाच्या झाडाला रुमालाच्या साहाय्याने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. आजूबाजूच्या ग्रामस्थांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक फौजदार अर्जुन सोनवणे करीत आहेत.