• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पाच वर्षाच्या चिमूरड्यासह आई व मावशीचा तापी नदीत बुडून मृत्यू !

यावल तालुक्यातील अंजाळे येथे कपडे धुताना घडली घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 15, 2025
in जळगाव जिल्हा
0
पाच वर्षाच्या चिमूरड्यासह आई व मावशीचा तापी नदीत बुडून मृत्यू !

यावल, (प्रतिनिधी) : तापी नदीपात्रात बुडणाऱ्या बालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याची आई व मावशी यांच्यासह तिन्ही जण बुडून मरण पावल्याची हृदयद्रावक व दुर्दैवी घटना यावल तालुक्यातील अंजाळे येथे सोमवारी दुपारी साडेबारा वाजता घडली. गावातील जागरण गोंधळ कार्यक्रमाकरिता ते नातेवाईकांकडे अंजाळे येथे आले होते. या घटनेने परिसरावर शोककळा पसरली आहे. यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील अंजाळे येथील घाणेकर नगरात बादल लहू भील यांच्याकडे जागरण गोंधळाचा कार्यक्रम असल्याने त्यानिमित्त त्यांच्या बहिणींसह नातेवाईक घरी आलेले होते. त्यात त्यांची मावस बहिण वैशाली सतीश भील (रा.अंतुर्ली, ता. अमळनेर) आणि मामे बहिण सपना गोपाळ सोनवणे (रा.पळाशी, ता. सोयगाव) याही आलेल्या होत्या. जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाल्यानंतर सोमवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास ते तापी नदीवर आंघोळीसह कपडे धुण्यासाठी गेले.

यावेळी वैशाली सतीश भील यांचा मुलगा नकुल (वय ५ वर्षे) हा खेळताना अचानक पाय घसरून पाण्यात पडल्याने गटांगळ्या खाऊन बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी त्याची आई वैशाली भील आणि मावशी सपना सोनवणे या दोघींनी पाण्यात उडी मारली. मात्र दुर्दैवाने या दोन्ही बहिणींना पोहता येत नसल्याने हे तिन्ही जण पाण्यात बुडाले. दरम्यान, यांच्यासोबत नदीवर गेलेल्या अनु सतीश भील या बालिकेने घरी धावत येऊन याची माहिती दिली. यानंतर पोहणाऱ्यांनी त्यांचा शोध घेऊन त्यांना पाण्याबाहेर काढले. मात्र तो पर्यंत फारच उशीर झाला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.

या दुर्घटनेत अंतुर्ली ता. अमळनेर येथील वैशाली सतीश भील व त्यांचा पाच वर्षाचा मुलगा नकुल तसेच पळाशी येथील सपना गोपाळ सोनवणे या तिघांचा मृत्यू झाला. तिघांच्या मृत्यूमुळे अंजाळे गावावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

Next Post
‘प्रधानमंत्री नॅशनल ॲप्रेंटिसशिप’ भरती मेळाव्याचे २१ एप्रिल ला आयोजन

'प्रधानमंत्री नॅशनल ॲप्रेंटिसशिप' भरती मेळाव्याचे २१ एप्रिल ला आयोजन

ताज्या बातम्या

डॉक्टर्स डे निमित्त वैद्यकीय नैतिकतेचा विद्यार्थ्यांना संदेश
आरोग्य

डॉक्टर्स डे निमित्त वैद्यकीय नैतिकतेचा विद्यार्थ्यांना संदेश

July 1, 2026
बहिणाई ज्येष्ठ नागरिक महिला संघाचा १८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
आरोग्य

बहिणाई ज्येष्ठ नागरिक महिला संघाचा १८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

July 1, 2026
आर. के. पाटील यांच्या प्रदीर्घ सेवेचा जळगावात गौरव; सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा

आर. के. पाटील यांच्या प्रदीर्घ सेवेचा जळगावात गौरव; सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा उत्साहात संपन्न

July 1, 2026
जळगाव एम.आय.डी.सी. पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्ट्यासह एक तरुण जेरबंद
गुन्हे

जळगाव एम.आय.डी.सी. पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्ट्यासह एक तरुण जेरबंद

June 30, 2026
‘एक भारत.. एक सुर’ कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश
जळगाव जिल्हा

‘एक भारत.. एक सुर’ कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश

June 30, 2026
तरुणांमध्ये हार पचविण्याची क्षमता हवी : कृष्णराज महाडिक
जळगाव जिल्हा

तरुणांमध्ये हार पचविण्याची क्षमता हवी : कृष्णराज महाडिक

June 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group