• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पंढरपूरच्या चंद्रभागा नदीत यावलच्या तरुणाचा बुडून मृत्यू

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 15, 2025
in जळगाव जिल्हा
0
पंढरपूरच्या चंद्रभागा नदीत यावलच्या तरुणाचा बुडून मृत्यू

जळगाव, (प्रतिनिधी) : श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी यावल तालुक्यातील दोघे मित्र दर्शनासाठी गेले असताना चंद्रभागा नदीत स्नान करण्यासाठी उतरले. त्यात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी समोर आली आहे. बुडालेल्या तरुणाचा सुमारे आठ तासानंतर मृतदेह मिळून आला आहे. पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते. त्यामुळे यावल तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

यावल तालुक्यातील न्हावी गावचा रहिवासी दर्शन नारायण कोलते (वय १८) असं बुडालेल्या तरूणाचे नाव आहे. दरम्यान दर्शन कोलते व त्याचा मित्र मनोज रघुनाथ कापडे (वय १८,रा. न्हावी ता. यावल) हे पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. पंढरपूरमध्ये पोहचल्यानंतर दर्शन आणि त्याचा मित्र सकाळी चंद्रभागा नदी पात्रात स्नानासाठी गेले होते. येथील भक्त पुंडलिक मंदिरजवळ ते नदीत उतरले होते. दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने दर्शन व त्याचा मित्र दोघे बुडाले. दोघेजण बुडत असल्याचे नदीत असलेल्या भाविकांच्या लक्षात आले.

यानंतर त्यांनी लागलीच मदत करत मनोज कापडे याला बाहेर काढत वाचवले. मात्र दर्शन कोलते याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह आठ तासांनी हाती लागला. याबाबतची माहिती स्थानिक प्रशासनाला देण्यात आली असून पोलीस प्रशासन व बचाव पथक येथे दाखल झाले त्यांच्याकडून बुडलेल्या तरूणाचा शोध सुरू करण्यात आला. सलग सुट्ट्या असल्यामुळे पंढरीत भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

Next Post
दुचाकी चोरी प्रकरणी एकास अटक ; अमळनेर पोलिसांची कामगिरी

दुचाकी चोरी प्रकरणी एकास अटक ; अमळनेर पोलिसांची कामगिरी

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add