• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पिकअप वाहनाचे टायर फुटल्याने अपघात ; १ ठार तर ६ जखमी

मुक्ताईनगर तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 6, 2025
in जळगाव जिल्हा
0
पिकअप वाहनाचे टायर फुटल्याने अपघात ; १ ठार तर ६ जखमी

जळगाव, (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर तालुक्यात मलकापूरकडे जाणाऱ्या महामार्गावर शनिवार दि. ५ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास भरधाव पिकअप वाहन टायर फुटल्याने व चालकाकडून नियंत्रण सुटल्याने पलटी झाले. या घटनेत १ जण ठार झाला असून ६ जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनिया सबला बारेला (वय ४०, रा. अडनदी ता. सेंधवा जि. बडवानी, मध्य प्रदेश, हल्ली मु. चिंचोली शिवार ता. जि. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. मयत बनिया बारेला याचा भाऊ रामसिंग सुभाष उर्फ सबला बारेला (वय ४४ वर्ष, रा. हरीविठ्ठल नगर, जळगाव) याने याबाबत फिर्याद दिली आहे. मध्य प्रदेशातून मुक्ताईनगरकडे येणारे पिकअप वाहन (एमपी १० झेडडी ४४४७) तुरीचे पोते घेऊन येत असताना वाहनाचे टायर फुटले व चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी झाले.

या अपघातामध्ये बनिया बारेला याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तो जागीच ठार झाला. तर गुड्ड्या वरजू बारेला (रा. ढवळ्यागिर ता. सेंधवा जि. बडवाणी), प्रेमसिंग दिलदार बारेला, दाविद बनिया बारेला (दोन्ही रा. अडनदी ता. सेंधवा जि. बडवानी), विकास ठाकूर रावत (रा. पीपलझोपा ता. भगवापुरा जि. खरगोन), महेश रामलाल बारेला (रा. भागपुर नशिराबाद ता. जळगाव) हे जखमी झाले आहे. चालक विनोद सहादरिया खरते (रा. शिरवेल महादेव ता. भगवानपुरा, जि. खरगोन, मध्यप्रदेश) याच्याविरोधात मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल महेश सुरवाडे करीत आहेत.

Tags: accidentmuktainagar
Next Post
क्षुल्लक कारणावरून तरुणावर प्राणघातक हल्ला, एकाला अटक

क्षुल्लक कारणावरून तरुणावर प्राणघातक हल्ला, एकाला अटक

ताज्या बातम्या

एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
जळगाव जिल्हा

एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

July 15, 2026
सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!
जळगाव जिल्हा

सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!

July 15, 2026
महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड
जळगाव जिल्हा

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड

July 15, 2026
रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद राहणार; ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय
जळगाव जिल्हा

रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद राहणार; ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय

July 15, 2026
गोदावरी इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय ईव्ही शिक्षक विकास कार्यक्रम उत्साहात समारोप
जळगाव जिल्हा

गोदावरी इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय ईव्ही शिक्षक विकास कार्यक्रम उत्साहात समारोप

July 15, 2026
जळगावात ‘परिवर्तन’तर्फे मंगेश पाडगावकरांच्या कवितांनी रंगणार ‘आषाढस्य प्रथम दिवसे’
मनोरंजन

जळगावात ‘परिवर्तन’तर्फे मंगेश पाडगावकरांच्या कवितांनी रंगणार ‘आषाढस्य प्रथम दिवसे’

July 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add