• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कन्नड घाटाच्या पायथ्याजवळ भीषण अपघात ; ३ ठार, ५ गंभीर

चाळीसगाव तालुक्यात कन्नड घाटाखाली अपघात

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 4, 2025
in जळगाव जिल्हा
0
कन्नड घाटाच्या पायथ्याजवळ भीषण अपघात ; ३ ठार, ५ गंभीर

चाळीसगाव, (प्रतिनिधी) : श्रीरामपूरहून नवस फेडून छत्रपती संभाजीनगरमार्गे पुन्हा चाळीसगावकडे परत येत असताना २० प्रवाशांनी भरलेली पिकअप गाडी कन्नड घाटाच्या पायथ्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने संरक्षण कठड्याला धडकली. या भीषण अपघातात तीनजण जागीच ठार झाले, तर ५ जण गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात बुधवारी रात्री ८ वाजता घडला. चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल पवार यांनी अन्य कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

पातोंडा येथील रहिवासी अतुल माळी यांच्या मुलीचा नवस फेडण्यासाठी बुधवारी सकाळी ४ वाजता (एमएच१९/बीएम ३९४७) या वाहनाने माळी कुटूंबातील २० जण श्रीरामपूर येथे गेले होते. नवस फेडण्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर हे सर्वजण पुन्हा याच वाहनातून छत्रपती संभाजीनगरमार्गे चाळीसगावकडे येत होते. या अपघातात सारजाबाई मधुकर माळी (६५, पातोंडा), नाना दामू माळी (पातोंडा), राहुल लक्ष्मण महाजन (गुढे, ता. भडगाव) हे तिघे जागीच ठार झाले. राजेंद्र भिमराव माळी (४२), अनिकेत रमेश माळी (१७), गौरव धर्मा माळी (१७), भिमराव भगवान माळी (३८), नाना संतोष माळी (३२), सुनीता रमेश माळी (३८, सर्व पातोंडा), संदीप संपत माळी, हरचंद पवार, निंबा काळू महाजन (६०, सर्व पोहरे) हे जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कन्नड घाटाच्या पायथ्याशी गाडी आली असता चालकाने वळण घेण्याचा प्रयत्न केला. मात्र वळणाचा अंदाज चुकला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन संरक्षण कठड्याला धडकले. एकूण २० जण या बसमधून प्रवास करत होते. घरगुती कार्यक्रमासाठी हे सारेजण श्रीरामपूर येथे गेले होते. परतीच्या वाटेवर असतानाच हा अपघात झाला. वाहनाचेही मोठे नुकसान झाले. जखमींना तातडीने उपचारार्थ ग्रामीण व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ग्रामीण पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Next Post
विष घेऊन तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न ; उपचारादरम्यान मृत्यू

विष घेऊन तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न ; उपचारादरम्यान मृत्यू

ताज्या बातम्या

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला
गुन्हे

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला

July 22, 2026
चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हे

चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
आरोग्य

डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026
कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन
आरोग्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

July 22, 2026
अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add