• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

टवाळखोरांच्या अड्ड्यावर फिरविला बुलडोझर ; आ. मंगेश चव्हाण यांचे महिलांनी मानले आभार

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 31, 2025
in जळगाव जिल्हा
0
टवाळखोरांच्या अड्ड्यावर फिरविला बुलडोझर ; आ. मंगेश चव्हाण यांचे महिलांनी मानले आभार

चाळीसगाव, (प्रतिनिधी) : चाळीसगावात टवाळखोरांच्या अड्ड्यावर बुलडोझर चालवून तो नष्ट करण्यात आला. आ. मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत न.पा.ची धडक कारवाई कौतुकाचा विषय ठरली. याबाबत परिसरातील महिला व मुलींनी आ. चव्हाण यांचा सत्कार केला.

शहरातील पाटणादेवी रोडवरील आदित्य कॉलनी भागात काही दिवसांपूर्वीच एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली होती. या भागात असणाऱ्या अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणी काही टवाळखोर मुले येणाऱ्या जाणाऱ्या महिलांची छेड काढत असल्याच्या देखील तक्रारी होत्या. याबाबत भागातील महिलांनी आ. मंगेश चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना होणारा त्रास कथन केला व आदित्य कॉलनी मधील टवाळखोरांचा तो अड्डा पाडून टाकण्याची विनंती केली. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत आमदार मंगेश चव्हाण यांनी तात्काळ चाळीसगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी यांना फोन करून सदर बांधकाम पाडण्यासाठी यावे असे कळविले व तात्काळ स्वतः महिलांसोबत त्या भागाला भेट दिली.

तिथे असणाऱ्या टवाळखोरांच्या अड्ड्यांची पाहणी केली व त्या अनधिकृत जागा जेसीबीने उध्वस्त केल्या. आ. मंगेश चव्हाण यांच्या या धडाकेबाज बुलडोझर कारवाईमुळे परिसरातील महिलांनी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले. हाकेला धावून येत तात्काळ बंदोबस्त केल्याबद्दल परिसराच्या वतीने आ. मंगेश चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. तुमचा भाऊ हा नेहमी तुमच्या सोबत असून कुठल्याही प्रकारची अडचण आली तर मी अर्ध्या रात्री तुमच्यासाठी हजर राहील. तसेच या भागातील नगरपालिकेच्या खुल्या जागांना देखील तार कंपाउंड करण्याचे आश्वासन आ. मंगेश चव्हाण यांनी यावेळी दिले.

Next Post
अल्पवयीन तरुणीने दिला मुलाला जन्म, तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

अल्पवयीन तरुणीने दिला मुलाला जन्म, तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

JCL T-20: अमळनेर सुहांस जायंट्स, रावेर रॉयल्स आणि चाळीसगाव चॅलेंजर्सची विजयी घोडदौड
क्रिडा

JCL T-20: अमळनेर सुहांस जायंट्स, रावेर रॉयल्स आणि चाळीसगाव चॅलेंजर्सची विजयी घोडदौड

April 22, 2026
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून डिजिटल सुविधांद्वारे सक्षम उद्योजक घडविण्यास चालना
जळगाव जिल्हा

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून डिजिटल सुविधांद्वारे सक्षम उद्योजक घडविण्यास चालना

April 22, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी वसंतराव पाटील यांची नियुक्ती
जळगाव जिल्हा

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी वसंतराव पाटील यांची नियुक्ती

April 22, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान

April 22, 2026
JCL T-20 चा थरार : जामनेर, जळगाव आणि अमळनेर संघांची विजयी घोडदौड
क्रिडा

JCL T-20 चा थरार : जामनेर, जळगाव आणि अमळनेर संघांची विजयी घोडदौड

April 21, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘आयसीआरईएसटी-२०२६’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘आयसीआरईएसटी-२०२६’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

April 21, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group