• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

लाच स्वरुपात मागितले चक्क हरभरे ! ; लाचखोर भू-करमापक गजाआड

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची रावेर तालुक्यात कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 29, 2025
in जळगाव जिल्हा
0
लाच स्वरुपात मागितले चक्क हरभरे ! ; लाचखोर भू-करमापक गजाआड

जळगाव, (प्रतिनिधी) : शेताची मोजणी केल्यानंतर खुणा दाखविण्याच्या मोबदल्यात भू-करमापकाने साडेपाच हजारांची लाच मागितली. परंतू शेतकऱ्याने पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर पैशांच्या मोबदल्यात अधिकारी राजेंद्र रमेश कुलकर्णी (वय ४८, रा. रावेर, ता. जळगाव) याने लाच स्वरुपात चक्क हरभरे मागितले होते. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कुलकर्णी यांना चार हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी रात्रीच्या सुमारास झाली. याप्रकरणी निंभोरा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रावेर तालुक्यातील मस्कावद येथे तक्रारदार यांचे सामाईक शेत असून त्यांनी दि. ७ जानेवारी रोजी अर्ज करुन शासकीय फी भरली हाती. त्यानंतर भूमीअभिलेख कार्यालयातील करभूमापक अधिकारी राजेंद्र कुलकर्णी यांनी शेतात जावून जमिनिचे मोजमाप केले होते. तक्रारदाराला मोजमापच्या खुणा दाखविण्यासाठी कुलकर्णी यांनी साडेपाच हजारांची लाच मागितली होती. त्यावेळी तक्रारदार यांनी पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर भूकरमापक यांनी शेतातील हरभरे दे असे सांगितले होते. परंतू तक्रारदाराला हरभरा देण्याची देखील ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

पडताळणीमध्ये आलोसे यांनी तक्रारदार यांना त्यांच्या शेतीच्या मोजमाप केलेल्या कामाचे खुणा दर्शवून सीमा निश्चिती करण्यासाठी तडजोडीनंतर चार हजारांची मागणी केली. पडताळणीत पैशांच्या मोबदल्यात हरभऱ्याची मागणी केली होती.

तडजोडीनंतर चार हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर भू-करमापक कुलकर्णी यांनी तक्रारदाराला निंभोरा येथे एका शेताजवळ बोलवून त्यांच्याकडून चार हजारांची लाच घेतांना सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Next Post
दुचाकी चोरट्याला अटक करून ४ वाहने जप्त ; एलसीबीची कामगिरी

दुचाकी चोरट्याला अटक करून ४ वाहने जप्त ; एलसीबीची कामगिरी

ताज्या बातम्या

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक
खान्देश

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक

August 28, 2026
भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त
गुन्हे

भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

August 28, 2026
हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी
जळगाव जिल्हा

हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी

August 28, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई
जळगाव जिल्हा

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

August 27, 2026
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया

August 27, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अंजोळा शिवारातील शेडमधून ४० हजारांचा मुद्देमाल लांबवला; यावल पोलिसांत गुन्हा दाखल

August 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add