• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जीएमसीत गुडघे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया ; ६५ वर्षीय वृद्धाला मिळाला दिलासा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 27, 2025
in जळगाव जिल्हा
0
जीएमसीत गुडघे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया ; ६५ वर्षीय वृद्धाला मिळाला दिलासा

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे अस्थिव्यगोपचार शास्त्र विभागांतर्गत ६४ वर्षांच्या वृद्धावर दोन्ही गुडघे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया (टोटल नी रिप्लेसमेंट) यशस्वीपणे पार पडली. या रुग्णाला नुकताच अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांचे हस्ते डिस्चार्ज कार्ड देऊन रुग्णालयातून निरोप देण्यात आला.

उत्तमसिंग पाटील (वय ६५, रा. व्यंकटेश नगर, जळगाव) रुग्ण हा गुडघेदुखीने मागील ५ वर्षांपासून त्रस्त असून बऱ्याच ठिकाणी औषधोपचार व भौतिकोपचार घेऊनदेखील सदर रुग्णाला आराम मिळत नव्हता. तसेच रुग्णाला दैनंदिन कामे करणे शक्य होत नव्हते. रुग्ण व्हीलचेअरवर मागील ६ महिन्यापासून होता. बाह्यरुग्ण विभागात सदर रुग्ण तपासणीकरीता आले असता डॉ.राजकुमार सूर्यवंशी व डॉ.अमोल पाटील यांनी त्यांना गुडघे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. रुग्णाला दाखल करून घेत सर्व वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. रुग्णाला दोन्ही गुडघे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्य अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी उपलब्ध करून दिले.

यामुळे रुग्णाच्या दोन्ही गुडघे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया नुकतीच अस्थीव्यंगोपचारशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ.राजकुमार सूर्यवंशी, सहयोगी प्रा. डॉ.राजेंद्र अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.अमोल पाटील, डॉ.निलेश पाटील, डॉ.पंकज घोगरे, डॉ.सुमित पाटील, डॉ. हनुमंत काळे, डॉ.साईनाथ, डॉ. तोसिफ, डॉ.अमोल कुऱ्हे यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. या शस्त्रक्रियेसाठी रूग्णास कोणताही खर्च करावा लागला नाही. वैद्यकीय पथकाच्या यशाबद्दल अधिष्ठाता डॉ.गिरीष ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ.धर्मेंद्र पाटील यांनी टीमचे अभिनंदन केले. तसेच रुग्णाच्या नातेवाईकांनी सर्व कर्मचारी व डॉक्टरांचे आभार मानले.

Next Post
दुचाकी अपघातात विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू

दुचाकी अपघातात विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू

ताज्या बातम्या

मैत्रिणीने पाशवी जाळ्यात ओढले; तरुणीवर अमली पदार्थ पाजून अत्याचार
गुन्हे

मैत्रिणीने पाशवी जाळ्यात ओढले; तरुणीवर अमली पदार्थ पाजून अत्याचार

June 4, 2026
अमळनेरच्या तीन महिन्यांच्या बालिकेला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार!
आरोग्य

अमळनेरच्या तीन महिन्यांच्या बालिकेला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार!

June 2, 2026
वेस्ट टू एनर्जी: डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या ‘अन्नपुर्णालयम’मध्ये कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती!
जळगाव जिल्हा

वेस्ट टू एनर्जी: डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या ‘अन्नपुर्णालयम’मध्ये कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती!

June 2, 2026
भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी
जळगाव जिल्हा

भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी

June 2, 2026
जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर
जळगाव जिल्हा

जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर

June 1, 2026
मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा

मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा

May 31, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group