• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कायदा-सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

शांतता समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी, एसपींचा इशारा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 26, 2025
in जळगाव जिल्हा
0
कायदा-सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

जळगाव, (प्रतिनिधी) : आगामी सण व उत्सव जिल्हावासीयांनी शांततेत आणि आनंदात साजरे करावे आगामी सण आणि उत्सवांच्या काळात पोलीस प्रशासन अधिक सतर्क राहणार असून, कायदा-सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले आहे.

जळगाव पोलीस दलाच्या वतीने आगामी काळात येणाऱ्या सर्व धर्मांच्या सणांच्या संदर्भात जिल्हास्तरीय शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी उपस्थित होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागरिकांना सण-उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन केले. तसेच, शांतता कमिटीच्या सदस्यांनी आपल्या परिसरातील घडामोडींवर लक्ष ठेवून पोलिसांना वेळेवर माहिती देत सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले. तर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका, तसेच कुणी आक्षेपार्ह मजकूर पसरवत असल्यास तत्काळ पोलिसांना कळवा. दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे सांगितले.

या बैठकीत हिंदू, मुस्लिम, बौद्ध आणि इतर समाज बांधवांसह विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. बैठकीत घेतलेल्या निर्णयांनुसार, समाजातील सर्व घटकांनी परस्पर सामंजस्याने आणि सलोख्यात हे सण साजरे करावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. यावेळी उपस्थित असलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत सर्वपक्षीय पदाधिकारी तसेच सर्व धर्मीय समाज बांधव यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी यांनी विचारलेल्या प्रश्नांचे निराकरण जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले. यावेळी शांतता समितीच्या सदस्यांना हेल्मेट वाटप करण्यात आले.

Next Post
कोल्हापुर-गोंदिया- कोल्हापुर एक्सप्रेसची संरचना जूनपासून बदलणार

कोल्हापुर-गोंदिया- कोल्हापुर एक्सप्रेसची संरचना जूनपासून बदलणार

ताज्या बातम्या

जळगावात एक लाखाची लाच घेताना पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात!
गुन्हे

जळगावात एक लाखाची लाच घेताना पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात!

April 13, 2026
पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू; मास्टर कॉलनीतील धक्कादायक घटना
गुन्हे

पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू; मास्टर कॉलनीतील धक्कादायक घटना

April 13, 2026
आशाताईंच्या सुरांनी जपली निसर्गाची कोमलता आणि मातीशी नाळ!
जळगाव जिल्हा

आशाताईंच्या सुरांनी जपली निसर्गाची कोमलता आणि मातीशी नाळ!

April 13, 2026
‘समन्वय २०२६’ चा दिमाखात शुभारंभ; ‘इन्फाईनाइट हॉरीझन’ थीमवर विद्यार्थ्यांनी साकारल्या कलाकृती
जळगाव जिल्हा

‘समन्वय २०२६’ चा दिमाखात शुभारंभ; ‘इन्फाईनाइट हॉरीझन’ थीमवर विद्यार्थ्यांनी साकारल्या कलाकृती

April 13, 2026
‘मनपा शाळा, शहराचा अभिमान’; उपमहापौर मनोज चौधरींकडून शाळांच्या सद्यस्थितीचा आढावा
जळगाव जिल्हा

‘मनपा शाळा, शहराचा अभिमान’; उपमहापौर मनोज चौधरींकडून शाळांच्या सद्यस्थितीचा आढावा

April 12, 2026
जळगावच्या अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावीत यांची नियुक्ती
गुन्हे

जळगावच्या अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावीत यांची नियुक्ती

April 11, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group