• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

तोतया रेल्वे टीसी पोलिसांच्या ताब्यात : लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वेतील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 25, 2025
in गुन्हे
0
तोतया रेल्वे टीसी पोलिसांच्या ताब्यात : लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वेतील घटना

भुसावळ, (प्रतिनिधी) : गोरखपूर ते लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेसमध्ये प्रवाशांच्या सतर्कतेमुळे एस ८ कोचमध्ये एक नकली तिकीट तपासनीस असल्याचे उघड झाले. रेल्वे अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत संशयित आरोपीला ताब्यात घेतले आणि पुढील चौकशी करून गुन्हा दाखल करण्यासाठी भुसावळ लोहमार्ग पोलिसांकडे सोपवले.

भोपाळ विभागाचे डीवाय सीटीआय मनोज कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २३ मार्च रोजी नियमित तपासणी दरम्यान, एस ८ कोचमध्ये एक प्रफुल गजभिये नावाची व्यक्ती तिकीट तपासणी करत असल्याचे आढळले. अधिकृत ओळखपत्र विचारले असता, त्याच्याकडे कोणतेही कागदपत्र आढळले नाही. यावेळी प्रवाशांनी सतर्कता दाखवत खंडवा ते नेपानगर दरम्यान हा नकली टीसी असल्याचे ओळखले आणि रेल्वे अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने कारवाई करत भुसावळ रेल्वे सुरक्षाबल आणि लोहमार्ग पोलिसांना माहिती कळवली.

भुसावळ रेल्वे कंट्रोलला एस आठ कोचमध्ये नकली टीसी फिरत असल्याची माहिती आधीच मिळाली होती. त्यामुळे गाडी दुपारी २ ते अडीचदरम्यान भुसावळ स्थानकावर पोहोचताच, रेल्वे सुरक्षा बलाच्या सहाय्यक निरीक्षक एन. के. सिंग आणि कॉन्स्टेबल नितेश कुशवाह तसेच भुसावळ लोहमार्ग पोलिसांचे कॉन्स्टेबल संजय जोशी यांनी सदर व्यक्तीला ताब्यात घेतले. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या प्रफुल गजभिये या संशयित आरोपीची भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्यात चौकशी सुरू असून, संध्याकाळपर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना फक्त अधिकृत रेल्वे कर्मचाऱ्यांकडूनच तिकीट तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तत्काळ रेल्वे हेल्पलाईन १३९ किंवा नजीकच्या रेल्वे सुरक्षा बलाला कळवावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून कळविण्यात आले.

Next Post
दारू विक्रेत्याचा पाठलाग करताना पोलीस कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू

दारू विक्रेत्याचा पाठलाग करताना पोलीस कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू

ताज्या बातम्या

जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड
गुन्हे

जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड

July 20, 2026
डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान
जळगाव जिल्हा

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

July 20, 2026
वैद्यकीय शिक्षण प्रगत अभ्यासक्रमात जळगावच्या प्राध्यापकांची उल्लेखनीय कामगिरी!
आरोग्य

वैद्यकीय शिक्षण प्रगत अभ्यासक्रमात जळगावच्या प्राध्यापकांची उल्लेखनीय कामगिरी!

July 20, 2026
शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त
गुन्हे

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त

July 18, 2026
डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी
शैक्षणिक

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

July 18, 2026
हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी
आरोग्य

हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

July 18, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add