• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सामूहिक विवाह सोहळे काळाची गरज.. – आ. एकनाथराव खडसे

लेवा पाटीदार समाजातर्फे सामुहिक विवाह सोहळ्यात लागले २३ विवाह

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 24, 2025
in सामाजिक
0
सामूहिक विवाह सोहळे काळाची गरज.. – आ. एकनाथराव खडसे

जळगाव, (प्रतिनिधी) : सध्या विवाहांमध्ये होणारा खर्च टाळणेसाठी सद्यपरिस्थितीत सामुहिक विवाह सोहळा ही एक काळाची गरज बनलेली आहे. समाजाची बांधीलकी जोपासण्यासाठी प्रत्येकाने पुढे येऊन आपले योगदान दिले पाहिजे. वधूवरानी भविष्यात कुरबुरी न करता समजंसपणे संसार करावा, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा विधान परिषदेचे आ. एकनाथराव खडसे यांनी केले.

लेवा एज्युकेशनल युनियन, जळगांव, अखिल भारतीय लेवा युवक महासंघ व बहिणाई ब्रिगेड, जळगांव यांचे संयुक्त विद्यमाने लेवा पाटीदार समाजातील वधु – वरांचा सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन दि. २३ मार्च रोजी सकाळी लेवा बोर्डीगचे प्रांगणात करण्यात आले. या सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये एकुण २३ वधु वरांचा सहभाग होता. लेवा पाटीदार समाजामध्ये १९९५ नंतर मोठ्या प्रमाणात सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन जळगांव शहरात करण्यात आले.

यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी आ. एकनाथराव खडसे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. राजूमामा भोळे, कुटुंबनायक ललित पाटील, भोरगाव लेवा पंचायतीचे सचिव ॲड. संजय राणे, लेवा एज्युकेशनल युनियनचे उपाध्यक्ष उल्हासशेठ चौधरी, सचिव प्रा. व. पु. होले, ॲड. प्रकाश पाटील, उद्योजक भालचंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणीताई खडसे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष केतकी पाटील, माजी महापौर आशाताई कोल्हे, सिंधुताई कोल्हे, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, ॲड. केतन ढाके आदी मान्यवर उपस्थित होते.

सुरुवातीला चिमुकले राम मंदिर येथून सर्व नवरदेवांची वरात ही वारकरी संप्रदायामधील वारक-यांच्या दिंडीसोबत सकाळी १० वा. निघाली होती. मार्गात पावली खेळून वर्हाडी मंडळींनी उत्साह आणला. नंतर विवाह स्थळी लेवा बोर्डीग येथे नवरदेवांचे स्वागत करण्यात आले. मंडपात आल्यावर मान्यवरांच्या उपस्थितीत मंत्रोच्चारात सर्व २३ जोडप्यांचा विधिवत विवाह सोहळा पार पडला. यानंतर मंचावर मान्यवरांनी येऊन दीपप्रज्वलन करीत देवतांसह समाजातील मान्यवरांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केला.

यावेळी ॲड. संजय राणे यांना नुकताच परदेशात उच्चस्तरीय सन्मान देऊन गौरव करण्यात आल्याबद्दल समाजातर्फे जाहिर नागरी सत्कार करण्यात आला. आ. राजूमामा भोळे म्हणाले की, उपक्रम कौतुकास्पद असून प्रत्येक समाजात विवाह सोहळ्यातील वाढत्या अनिष्ठ रूढी आणि पैशांचा व वेळेचा अपव्यय बघता समाजमंडळांनी अशा सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणे ही काळाची गरज बनली आहे. यातून गोरगरीब परिवारातील उपवर मुलामुलींचे विवाह अल्प खर्चात पार पडतात. यामुळे वेळ आणि खर्चाची बचत होते, असेही आ. भोळे म्हणाले.

सामूहिक विवाह संमेलनातून सामाजिक हित साधले जाते. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना मदत आणि आधार देण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहेत. समाजातील मोठ्या, साधनसंपन्न व्यक्तींनीही आपल्या कुटुंबातील मुलामुलींच्या विवाहासाठी अशा संमेलनांमध्ये पुढे यावे, असे आवाहन यावेळी कुटुंबनायक ललित रमेश पाटील यांनी केले. या प्रसंगी सर्व वधु-वरांना संसारसाठी लागणारे आंदण (भांडी) व इतर गृहपयोगी वस्तु देण्यात आली आहे.

प्रास्ताविक ॲड. संजय राणे यांनी केले. सूत्रसंचालन स्वाती भोळे, आणि वैशाली झोपे यांनी केले. आभार ॲड. प्रकाश पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी लेवा एज्युकेशनल युनियन, जळगांव, अखिल भारतीय लेवा युवक महासंघ व बहिणाई ब्रिगेड, जळगांव यांचे कर्मचारी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

 


 

Next Post
युवराज कोळी खून प्रकरणातील तिसरा संशयित पोलिसांनी केला जेरबंद

युवराज कोळी खून प्रकरणातील तिसरा संशयित पोलिसांनी केला जेरबंद

ताज्या बातम्या

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान
जळगाव जिल्हा

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 8, 2026
जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 
गुन्हे

जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 

September 8, 2026
गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
गुन्हे

गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add