• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शुल्लक कारणावरून माजी उपसरपंचाचा निर्घृण खून

जळगाव तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 21, 2025
in गुन्हे
0
शुल्लक कारणावरून माजी उपसरपंचाचा निर्घृण खून

जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील भादली गावात किरकोळ वादातून एका ३६ वर्षीय माजी उपसरपंच तरुणाचा छातीत धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची घटना शुक्रवारी २१ मार्च रोजी सकाळी ८ वाजता घडली आहे. नशिराबाद पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते. दरम्यान जळगाव तालुक्यात खुनाची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

युवराज सोपान कोळी (वय ३५ रा. कानसवाडा ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. युवराज सोपान कोळी हा आई वडील, तीन मुलं, पत्नी यांच्यासह वास्तव्याला होता. शेतीचे काम करून ते उदरनिर्वाह करत होते. युवराज कोळी याचा गुरुवारी रात्री काहींसोबत वाद झाला होता. या वादातून अज्ञात तीन जणांनी चाकू आणि चॉपरने वार करून खून करण्यात आला.

काही शेतकऱ्यांच्या समोर ही घटना घडल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तोपर्यंत मारेकरी पसार झाले होते. युवराज याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून युवराज यांना मयत घोषित केले. यावेळी नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रचंड गर्दी करत आक्रोश केला होता. मयत हे शिंदे गटाचे माजी उपसरपंच असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. दरम्यान पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. नशिराबाद पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Next Post
शेतातील गव्हाला आग ; पीक जळून खाक

शेतातील गव्हाला आग ; पीक जळून खाक

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत बालकलावंतांचा पालकांसह गौरव
गुन्हे

सेवा संकल्प अभियानांतर्गत बालकलावंतांचा पालकांसह गौरव

October 12, 2026
सनातन विकासाठी नदी संवर्धन महत्त्वाचे – डॉ. राजेंद्र सिंह
खान्देश

सनातन विकासाठी नदी संवर्धन महत्त्वाचे – डॉ. राजेंद्र सिंह

October 12, 2026
वीर गुर्जर सेनेची कार्यकारिणी जाहीर; कौटुंबिक प्रश्न सोडवण्यासाठी ‘न्याय निवाडा मंडळ’ स्थापन होणार
जळगाव जिल्हा

वीर गुर्जर सेनेची कार्यकारिणी जाहीर; कौटुंबिक प्रश्न सोडवण्यासाठी ‘न्याय निवाडा मंडळ’ स्थापन होणार

October 12, 2026
नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!
खान्देश

नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

October 11, 2026
महादेव रुग्णालयात गोल्डन अवर्समध्ये रूग्णावरील न्युरोसर्जरी यशस्वी
आरोग्य

महादेव रुग्णालयात गोल्डन अवर्समध्ये रूग्णावरील न्युरोसर्जरी यशस्वी

October 10, 2026
जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’चा मान!
खान्देश

जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’चा मान!

October 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add