• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

हनी ट्रॅप : ७ वर्षात तब्बल ११ लाखांची खंडणी वसूल !

अखेर महिलेला सापळा सचत पोलिसांनी पकडले रंगेहाथ

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 21, 2025
in गुन्हे
0
हनी ट्रॅप : ७ वर्षात तब्बल ११ लाखांची खंडणी वसूल !

रावेर, (प्रतिनिधी) : शहरातील व्यापाऱ्यास गुंगीचे औषध पाजून त्याच्याशी अश्लील विडिओ तयार केला. एवढेच नाही तर तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ७ वर्षात तब्बल ११ लाखांची खंडणी चोपड़ा तालुक्यातील लोणी अडावद येथील महिलेने वसूल केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुन्हा १ लाख रुपये घेण्यासाठी १९ रोजी बुधवारी ही महिला शहरात पीडित व्यापाऱ्याच्या कार्यालयात आली असता सापळा रचत रावेर पोलिसांनी तिला रंगेहाथ पकडले.

सन २०१८ मध्ये जळगाव शहरात ४३ वर्षीय व्यापाऱ्याला त्याच्या चारचाकी कारमधून लिफ्ट मागून प्रतिभा हिरालाल पाटील हिने विमा एजंट असल्याची ओळख दिली. हळूहळू मोबाइलवर फुलवलेल्या मैत्रीतून चोपडा तालुक्यातील लोणी अडावद येथे तिच्या घरी भोजनासाठी बोलावून शीतपेयात काही तरी गुंगीचे औषध पाजून आपत्तीजनक व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्याची घटना घडली. आपत्तीजनक व्हिडीओ पीडित व्यापाऱ्याच्या घरी व सोशल मीडियावर प्रसारीत करण्याची धमकी देत ३० डिसेंबर २०२३ पासून १९ मार्चपावेतो एकूण ११ लाख रुपयांची खंडणी आरोपी महिलेने तिच्या स्वतःच्या व तिचा मुलगा निर्मल चुन्नीलाल पाटील (वय २१) याच्या खात्यात ऑनलाइन घेतली. दरम्यान, पीडित व्यापारी विकत असलेल्या शेतीचे बाजारमूल्य ५ कोटीपर्यंत असल्याची माहिती मिळताच या महिलेने पीडित व्यापाऱ्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन या व्यापाऱ्याने तिच्याकडून पाच कोटी रुपये हातउसने घेतल्याच्या खोट्या पावतीचा नोटरी करारनामा २१ फेब्रुवारी २०२५ रोजी करून घेतला.

त्या पाच कोटींपैकी १ लाखाची मागितलेली खंडणी घेण्यासाठी प्रतिभा ही व्यापाऱ्याच्या रावेर येथील कार्यालयात आली असता, रावेर पोलिस स्टेशनचे निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अंकुश जाधव, महिला फौजदार प्रीती वसावे, महिला पो. कॉ. माधवी सोनवणे, महेश मोगरे, सुकेश तडवी, श्रीकांत चव्हाण यांनी दोन पंचांसमक्ष घटनास्थळी छापा टाकून पीडिताकडून एक लाखाची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले. ही कारवाई १९ मार्च रोजी दुपारी ३:४२ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी महिला आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अंकुश जाधव हे करीत आहेत.

Next Post
एमपीएससी परीक्षा यावर्षीपासून युपीएससीच्या धर्तीवर होणार

एमपीएससी परीक्षा यावर्षीपासून युपीएससीच्या धर्तीवर होणार

ताज्या बातम्या

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श
कृषी

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

October 14, 2025
जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित
खान्देश

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित

October 14, 2025
अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
खान्देश

अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

October 14, 2025
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड
खान्देश

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड

October 14, 2025
पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप
कृषी

पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप

October 13, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group