• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 17, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी

​जळगाव, (प्रतिनिधी) : ​एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या पोलीस नाईकाला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी गुरुवारी हे कठोर पाऊल उचलले. यासोबतच, या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनाही तडकाफडकी नियंत्रण कक्षात जमा (कंट्रोल जमा) करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


​​शनिपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक विनोद पितांबर अहिरे याला काही दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सापळा रचून पकडले होते. एका तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना त्याला रंगेहात अटक करण्यात आली होती. या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ माजली होती.

​अखेर बडतर्फीची कारवाई..
​लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर विनोद अहिरे याच्यावर विभागीय स्तरावर कोणती कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर १६ एप्रिल रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी कायदेशीर अधिकारांचा वापर करत अहिरे याला पोलीस प्रशासनातून बडतर्फ (Dismiss) करण्याचे आदेश निर्गमित केले.

​केवळ लाच घेणाऱ्या कर्मचाऱ्यावरच नव्हे, तर संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रमुखावरही प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जळगाव पोलीस दलातील लाचखोर प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

​”भ्रष्टाचाराच्या बाबतीत ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबवले जात असून, कोणत्याही प्रकारची शिस्तभंग किंवा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही,” असा कडक संदेश या कारवाईतून पोलीस अधीक्षकांनी दिला आहे.


 

Tags: #dismiss#jalgaon_cityPolice
Next Post
सावधान! बालविवाहाचा प्रयत्न पडेल महागात; जळगाव प्रशासन ‘अलर्ट’

सावधान! बालविवाहाचा प्रयत्न पडेल महागात; जळगाव प्रशासन 'अलर्ट'

ताज्या बातम्या

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
खान्देश

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद
गुन्हे

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद

August 31, 2026
सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील
आरोग्य

सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील

August 31, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अमळनेर तालुक्यात भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्यावर कारवाई

August 31, 2026
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
जळगाव जिल्हा

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

August 31, 2026
महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार
खान्देश

महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार

August 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add