• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दुचाकी चोरटे एमआयडीसी पोलीसांच्या जाळ्यात

चार दुचाकी जप्त, मालेगावात प्राणघातक हल्ला करून होते फरारी !

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 20, 2025
in गुन्हे
0
दुचाकी चोरटे एमआयडीसी पोलीसांच्या जाळ्यात

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरामध्ये दुचाकी चोरांचा तपास करीत असताना एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने मालेगाव येथील दोघांना व जळगाव शहरातील शाहूनगर येथील एका तरुणाला शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली. त्यांच्याकडून ४ दुचाकी जप्त करण्यात आले आहेत. तसेच मालेगाव येथील प्राणघातक हल्ल्यातील दोघे संशयित असून ते फरार होते. या कारवाईमुळे त्यांचाही शोध लागला आहे.

मोबीन शाहू शकील शाह (वय २०, रा. चमननगर, मालेगाव, जि. नाशिक) दानिश शाह जहीर शाह (वय २०, रा. गांधीनगर, मालेगाव, जि. नाशिक) अमीर उर्फ अमीन शाह जहुन शाह (वय २२,रा. शाहूनगर, जळगाव) या तिघांना अटक करण्यात आली आहे. रविवार दि. १६ मार्च रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक पोलीस निरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, रवींद्र चौधरी, नाईक प्रदीप चौधरी, रतन गीते, सिद्धेश डापकर, जयेश हटकर असे पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळेला तिघेही संशयित आरोपी हे पथकाला दिसले.

त्यांनी त्यांना थांबवून चौकशी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते पळून जाऊ लागले. तेव्हा पोलिसांनी शिताफीने त्यांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांची चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातून ४ दुचाकी मोटरसायकल जप्त करण्यात आले आहे. तसेच आझाद नगर पोलीस स्टेशन, मालेगाव येथे एका इसमाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे दाखल गुन्ह्यात मालेगाव येथील दोघे फरार होते. सदर दुचाकी चोरीचे गुन्हे एमआयडीसी पोलीस स्टेशन, जिल्हा पेठ पोलीस स्टेशन, मालेगाव शहर पोलीस स्टेशन यासह आणखी एका ठिकाणी गुन्हा दाखल आहेत.

Next Post
घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी ६० हजाराचा मुद्देमाल केला लंपास

घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी ६० हजाराचा मुद्देमाल केला लंपास

ताज्या बातम्या

भु-करमापकावर १५ हजारांची लाच घेताना जळगावात एसीबीचा यशस्वी सापळा; जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल
गुन्हे

भु-करमापकावर १५ हजारांची लाच घेताना जळगावात एसीबीचा यशस्वी सापळा; जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल

July 2, 2026
डॉक्टर्स डे निमित्त वैद्यकीय नैतिकतेचा विद्यार्थ्यांना संदेश
आरोग्य

डॉक्टर्स डे निमित्त वैद्यकीय नैतिकतेचा विद्यार्थ्यांना संदेश

July 1, 2026
बहिणाई ज्येष्ठ नागरिक महिला संघाचा १८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
आरोग्य

बहिणाई ज्येष्ठ नागरिक महिला संघाचा १८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

July 1, 2026
आर. के. पाटील यांच्या प्रदीर्घ सेवेचा जळगावात गौरव; सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा

आर. के. पाटील यांच्या प्रदीर्घ सेवेचा जळगावात गौरव; सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा उत्साहात संपन्न

July 1, 2026
जळगाव एम.आय.डी.सी. पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्ट्यासह एक तरुण जेरबंद
गुन्हे

जळगाव एम.आय.डी.सी. पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्ट्यासह एक तरुण जेरबंद

June 30, 2026
‘एक भारत.. एक सुर’ कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश
जळगाव जिल्हा

‘एक भारत.. एक सुर’ कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश

June 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group