• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अपघातात जखमी झालेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू

कॉलेज संपल्यावर घरी जाताना झाला होता अपघात, गोराडखेडा गावावर शोककळा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 4, 2025
in जळगाव जिल्हा
0
अपघातात जखमी झालेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील वावडदा ते वडलीदरम्यान महाविद्यालयीन विद्यार्थी घरी परतत असताना झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र सोमवारी दि. ३ मार्च रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.

निशांत विजय पाटील (राजपूत, वय १९, रा. गोराडखेडा ता. पाचोरा) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई. वडील, १ बहीण असा परिवार आहे. जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात तो प्रथम वर्षाचे शिक्षण घेत होता. तर वडील विजय पाटील हे गोराडखेडा गावचे उपसरपंच आहेत. दरम्यान, शुक्रवारी दि. २८ फेब्रुवारी रोजी निशांत हा महाविद्यालयातून घराकडे संध्याकाळी ७ वाजता दुचाकीने निघाला होता. सुमारे ८ वाजता तो वावडदा ते वडलीदरम्यान आला असताना त्याच्या दुचाकीचा अपघात झाला.

अपघातात निशांतच्या डोक्याला जबर मार लागलेला असल्याने नातेवाईकांनी त्याला जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान, निशांतवर उपचार सुरु असताना सोमवारी दि. ३ मार्च रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.(केपी)पुढील कार्यवाहीसाठी त्याचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस तपास सुरु आहे. तर तरुण मुलाच्या मृत्यूमुळे गोराडखेडा गावावर शोककळा पसरली आहे.

Next Post
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने गरोदर, गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने गरोदर, गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त
गुन्हे

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त

July 18, 2026
डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी
शैक्षणिक

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

July 18, 2026
हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी
आरोग्य

हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

July 18, 2026
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग
शैक्षणिक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 17, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
आरोग्य

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 17, 2026
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद
आरोग्य

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

July 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add