• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गावठी पिस्टल, काडतूसह एकास अटक ; चाळीसगाव शहर पोलिसांची कामगिरी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 1, 2025
in गुन्हे
0
गावठी पिस्टल, काडतूसह एकास अटक ; चाळीसगाव शहर पोलिसांची कामगिरी

चाळीसगाव, (प्रतिनिधी) : येथील चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी गोपनीय माहितीवरून हॉटेलमधून एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून गावठी पिस्टल आणि २ जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले, पोहेकॉ योगेश बेलदार, पो.हे.कॉ. राकेश पाटील, पो.हे.कॉ. अजय पाटील, पो.ना. नितीन आगोणे व पोकॉ. निलेश पाटील हे चाळीसगाव शहरात गस्त घालत असताना उपनिरीक्षक संदीप घुले यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. स्टेशन रोड, चाळीसगाव येथे एक इसम गावठी कट्टा बाळगून आहे. त्यानुसार, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन सापळा रचला. किरण कैलास गायकवाड (वय २१, रा. संवसर, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर, सध्या शिर्डी बायपास, खंडोबा मंदिर जवळ, ता. राहता, जि. अहिल्यानगर) याला ताब्यात घेतले.

त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे १ गावठी पिस्टल व २ जीवंत काडतुस असा एकूण ३२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल आढळून आला. याबाबत पंचनामा करून पोलिसांनी शस्त्र व काडतुसे जप्त केली. सदर इसमाविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजेशसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकाद्वारे करण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक संदीप घुले व पो.हे.कॉ. राकेश पाटील, चाळीसगाव शहर पोलीस ठाणे करीत आहेत.

Next Post
जळगावच्या विमानतळ विस्तारीकरणाला हिरवा कंदील !

जळगावच्या विमानतळ विस्तारीकरणाला हिरवा कंदील !

ताज्या बातम्या

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला
गुन्हे

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला

July 22, 2026
चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हे

चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
आरोग्य

डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026
कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन
आरोग्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

July 22, 2026
अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add