• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कारला कंटेनरची जबर धडक ; पत्नीचा मृत्यू, पतीसह ३ मुले गंभीर जखमी

एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 25, 2025
in जळगाव जिल्हा
0
कारला कंटेनरची जबर धडक ; पत्नीचा मृत्यू, पतीसह ३ मुले गंभीर जखमी

जळगाव, (प्रतिनिधी) : मुक्ताईनगरमधील पाटील कुटुंब शिर्डीवरून साईबाबांचं दर्शन घेऊन परत येत असताना एरंडोल जवळ कंटेनरने कारला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. अपघातात पत्नीचा मृत्यू झाला आहे. तर पतीसह ३ मुले गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना एरंडोल ते धरणगाव दरम्यानच्या पिंपळकोठा गावाजवळ घडली आहे. एरंडोल पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम रात्री सुरु होते.

मुक्ताईनगर येथील शिक्षक राजेश वासुदेव पाटील (वय ४६) हे पत्नी रुपाली पाटील (वय ४०) आणि तीन मुलांसह शिर्डीला देवदर्शनासाठी गेले होते. सोमवारी २४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२.३० वाजता मुक्ताईनगरकडे परतत होते. त्यावेळी एरंडोल ते जळगाव दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर यूपी ढाब्यासमोर अचानक आलेल्या कंटेनरने (डब्लू बी २३ एफ ९४७२) त्यांच्या मारुती स्विफ्ट कारला (एमएच १९ सिक्यू ७००९) रस्त्यावर अचानक मागून धडक दिली. धडकेनंतर कार रस्त्याच्या डिव्हायडरवर आदळली. हा अपघात इतरका भीषण होता, की अपघातात राजेश पाटील यांच्या पत्नी रुपाली पाटील आणि तीन मुलं – खुशी, स्वरा आणि गुरु हे सर्व जण गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी तत्काळ मदतकार्य हाती घेतलं. रुग्णवाहिकेद्वारे जखमींना एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी रुपाली पाटील यांना मृत घोषित केलं. त्याचवेळी ३ मुलांना एरंडोल येथील खाजगी रुग्णालयात दाखल केलं. कंटेनर चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अचानक वाहन रस्त्यावर आणल्यामुळे अपघात झाला, असे फिर्यादी राजेश पाटील यांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर राजेश पाटील यांनी एरंडोल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, कंटेनर चालकाविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Next Post
चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून ९१ हजारांचा ऐवज लांबविला !

चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून ९१ हजारांचा ऐवज लांबविला !

ताज्या बातम्या

लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी
गुन्हे

लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी

April 17, 2026
जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न
क्रिडा

जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न

April 16, 2026
जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप
जळगाव जिल्हा

जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप

April 16, 2026
जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश

April 16, 2026
जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा
जळगाव जिल्हा

जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा

April 16, 2026
आईला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम जेरबंद
गुन्हे

आईला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम जेरबंद

April 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group