• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

घरफोडी करणाऱ्या संशयितास अटक ; सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव एलसीबीची कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 22, 2025
in गुन्हे
0
घरफोडी करणाऱ्या संशयितास अटक ; सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव, (प्रतिनिधी) : निवृत्ती नगर भागातील संकल्पसिद्धी अपार्टमेंटमध्ये झालेल्या चोरी प्रकरणी एका संशयित आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी २० फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता अटक केली आहे. सेवानिवृत्त शिक्षक अनिल लक्ष्मण सपकाळे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्याकडून रोख रक्कम व मोटारसायकलसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुरुवारी १८ फेब्रुवारी रोजी अनिल सपकाळे आईला भेटण्यासाठी गेले असताना त्यांच्या अपार्टमेंटमधील बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती. या चोरीबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात बुधवारी १९ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा तपास सुरू असताना, संशयित सदर गुन्हा सचिन भागवत सपकाळ (वय ३३, रा. मोहाडी, ता. जामनेर, जि. जळगाव) याने आपल्या साथीदारांसह केला आहे या माहितीच्या आधारे पोलीसांनी सचिन सपकाळ याला ताब्यात घेतले.

प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या इतर तीन साथीदारांसह दोन मोटारसायकलचा वापर करून संकल्पसिद्धी अपार्टमेंटमधील बंद घर फोडल्याचे स्पष्ट झाले. आरोपी सचिन सपकाळकडून चोरीसाठी वापरलेली बजाज कंपनीची प्लॅटीना मोटारसायकल (एम एच १९ ईएल ३७६१), रोख ५० हजार रुपये, तसेच १ ग्रॅम सोन्याची अंगठी असा एकूण १ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सचिन सपकाळ याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

सदरची कारवाई डॉ.महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनिरी दत्तात्रय पोटे, सफौ विजयसिंग पाटील, अतुल वंजारी, अकरम शेख, महेश महाजन, प्रविण भालेराव, राहुल पाटील, भारत पाटील, महेश सोमवंशी सर्व नेम, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी केली आहे.

Next Post
कृषी कार्यालयात गळफास घेऊन कर्मचाऱ्याची आत्महत्या

कृषी कार्यालयात गळफास घेऊन कर्मचाऱ्याची आत्महत्या

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!
गुन्हे

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!
गुन्हे

अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!

October 12, 2026
जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

October 12, 2026
टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
खान्देश

टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add