• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

तरुणावर प्राणघातक हल्ला ; जामिनावर सुटताच डोक्यात लोखंडी वस्तूने केली मारहाण

जळगाव शहरात खळबळ जनक घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 22, 2025
in गुन्हे
0
तरुणावर प्राणघातक हल्ला ; जामिनावर सुटताच डोक्यात लोखंडी वस्तूने केली मारहाण

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील शाहूनगर परिसरात जामिनावर सुटून घरी जात असलेल्या तरुणावर अज्ञात २० ते २५ जणांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर त्याच्यासोबत असलेले वडील व भाऊ देखील जखमी झाले आहे.

प्रतीक हरदास निंबाळकर (वय २४, रा. सिटी कॉलनी, कानळदा रोड, जळगाव) असे गंभीर जखमी असलेल्या तरुणाचे नाव आहे. तो चार वर्षापासून खुनाच्या आरोपाखाली जिल्हा कारागृहात होता. नोव्हेंबर २०२० पासून त्याला जिल्हा कारागृहामध्ये ठेवण्यात आले होते. दरम्यान शुक्रवारी दि.२१ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी त्याचा जामीन झाल्यावर जिल्हा कारागृहातून प्रतीकचे वडील हरदास निंबाळकर आणि भाऊ वैभव निंबाळकर हे त्याला घेऊन दुचाकीवरून घरी जात असताना शाहूनगरजवळ आले असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत तिघेही पिता पुत्र खाली पडले.

यानंतर हल्लेखोरांनी प्रतीक निंबाळकर याला लक्ष्य करत त्याच्यावर धारदार लोखंडी वस्तू आणि धारदार शस्त्राने डोक्यावर उजव्या बाजूला जोरदार प्रहार करून गंभीर जखमी केले. तर प्रतीकचे वडील हरदास आणि भाऊ वैभव यांनादेखील दगडांनी व इतर वस्तूंनी मारहाण केली. मारेकरी निघून गेल्यावर प्रतीक निंबाळकर याला त्याचे वडील व भाऊंनी रिक्षात टाकून तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी आणले.

या ठिकाणी वैद्यकीय पथकाने अतिदक्षता विभागामध्ये तात्काळ प्रतिक निंबाळकर यांच्यावर उपचार सुरू केले. दरम्यान, जळगाव शहर पोलीस स्टेशनला व एलसीबीला घटना कळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तसेच संशयित आरोपी यांच्याविषयी डीवायएसपी संदीप गावित आणि पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांनी शासकीय रुग्णालयात येऊन माहिती घेतली. दरम्यान प्रतीक निंबाळकर याच्या उजव्या बाजूला डोक्यात कवटी फ्रॅक्चर झाल्याने व डोक्यात रक्तस्राव झाल्याने तो गंभीर जखमी झाल्याची माहिती वैद्यकीय पथकाकडून मिळाली आहे.

दरम्यान संशयित हल्लेखोरांची माहिती पोलिसांना मिळाली असून पोलीस त्यांच्या मागावर असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिले आहे. दरम्यान, जळगाव शहरात २ दिवसापूर्वी अयोध्या नगरात झालेल्या प्राणघातक हल्ला झाल्यानंतर आता पुन्हा ही घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.


 

Next Post
घरफोडी करणाऱ्या संशयितास अटक ; सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

घरफोडी करणाऱ्या संशयितास अटक ; सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक
खान्देश

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक

August 28, 2026
भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त
गुन्हे

भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

August 28, 2026
हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी
जळगाव जिल्हा

हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी

August 28, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई
जळगाव जिल्हा

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

August 27, 2026
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया

August 27, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अंजोळा शिवारातील शेडमधून ४० हजारांचा मुद्देमाल लांबवला; यावल पोलिसांत गुन्हा दाखल

August 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add