• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरटयांनी लांबवली !

जळगावात पोलिसाच्या आईसोबत घडली घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 20, 2025
in गुन्हे
0
वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरटयांनी लांबवली !

जळगाव, (प्रतिनिधी) : मंदिरातून घरी येत असलेल्या ८५ वर्षीय वृद्धेच्या गळ्यातून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी सोनपोत लांबवली. ही घटना मंगळवारी १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास गुजराल पेट्रोलपंपामागील हायवेदर्शन कॉलनीत घडली. पोत ओढतांना वृद्ध महिला रस्त्यावर कोसळून फरफटल्याने जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान, चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.

जिल्हा पोलीस दलातील दहशतवाद विरोधी शाखेमध्ये कार्यरत असलेले उपनिरीक्षक भाऊसाहेब काशीनाथ पाटील हे हायवेदर्शन कॉलनीत वास्तव्यास आहे. त्यांची आई शेवंताबाई काशीनाथ पाटील (वय ८५) या नेहमीप्रमाणे त्यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या टिळक नगरातील विठ्ठल मंदिरात गेल्या होत्या. दर्शन आटोपून त्या रस्त्याने घराकडे येण्यासाठी निघाल्या. घरी जाण्यासाठी त्या रस्ता ओलांडत असतांना मागून भरधाव वेगाने दोन दुचाकीस्वार त्यांच्याजवळ आले. त्यांनी पुढे जावून काही अंतरावर दुचाकी थांबवली. पुन्हा ते वृद्ध महिलेच्या दिशेने गेले आणि दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्याने वृद्धेच्या गळ्यातून सोन्याची पोत ओढून नेली.

सोनपोत ओढल्यामुळे वृद्ध शेवंताबाई पाटील या रस्त्यावर कोसळून फरफटल्या गेल्या. त्यामुळे त्यांच्या हाताला दुखापत झाली असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. कोसळल्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्याठिकाणी येत असल्याचे दिसताच चोरटे तेथून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, दुचाकीवरुन दोन चोरटे सोनसाखळी चोरतांना कैद झाले आहे. पोलिसांनी ते फुटेज हस्तगत केले असून त्यानुसार संशयितांचा शोध घेतला जात आहे.

Next Post
शिक्षिकेच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्राची धावत्या बस मधून चोरी

बसमध्ये चाढतांना वृद्ध महिलेच्या सोन्याच्या बांगड्या लंपास

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!
गुन्हे

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!
गुन्हे

अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!

October 12, 2026
जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

October 12, 2026
टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
खान्देश

टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add