• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

चाकूने भोसकून तरूणाचा निर्घृण खून ; संशयित अटकेत

पाचोरा शहरातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 19, 2025
in गुन्हे
0
चाकूने भोसकून तरूणाचा निर्घृण खून ; संशयित अटकेत

पाचोरा, (प्रतिनिधी) : शहरात किरकोळ कारणावरून २० वर्षीय तरुणावर चाकुने वार करत खुन केल्याची घटना शहरातील बाहेरपुरा भागात मध्यरात्री १२:३० वाजता घडली. घटनेतील मारेकऱ्यास पाचोरा पोलिसांनी जेरबंद केले आहे. या घटनेप्रकरणी मारेकऱ्याविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन दिनांक १८ रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास शिवजयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. १२ वाजुन १५ मिनिटांनी मिरवणूक संपल्यानंतर हेमंत संजय सोनवणे (वय २०, रा. जुना माहेजी नाका, महात्मा फुले नगर, पाचोरा) यास शहरातील बाहेरपुरा येथे संशयीत आरोपी रोहित गजानन लोणारी (वय २०, रा. शिव काॅलनी, पाचोरा) याने किरकोळ कारणावरून धारदार चाकूने पोटात वार करुन घटना स्थळावरुन पसार झाला.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अशोक पवार व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल होवुन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या हेमंत सोनवणे यास तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हेमंत सोनवणे हा गंभीर जखमी असल्याने त्यास जळगाव येथे उपचारार्थ हलविण्यात आले. तर हेमंत सोनवणे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रोहीत लोणारी यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये रोहित लोणारी यांच्या विरुध्द खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला असुन घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार हे करीत आहे. रोहित लोणारी याने हेमंत सोनवणे याचा खुन का केला ? याचा पोलीस तपास करीत आहेत.

Next Post
कर्तव्यासाठी गेलेल्या होमगार्डचा हृदयविकाराने मृत्यू

कर्तव्यासाठी गेलेल्या होमगार्डचा हृदयविकाराने मृत्यू

ताज्या बातम्या

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या
गुन्हे

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या

March 4, 2026
जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group