• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कर्तव्यासाठी गेलेल्या होमगार्डचा हृदयविकाराने मृत्यू

चोपडा तालुक्यातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 19, 2025
in जळगाव जिल्हा
0
कर्तव्यासाठी गेलेल्या होमगार्डचा हृदयविकाराने मृत्यू

चोपडा, (प्रतिनिधी) : तालुक्यातील पार उमर्टी भागात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यावर कर्तव्यासाठी गेलेल्या होमगार्डचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी दि. १६ रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील लासुर येथील रहिवासी असलेले ५१ वर्षीय कुंदनलाल रघुनाथ बोरसे यांची इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी ड्युटी लावण्यात आली आहे. शनिवारी दि. १५ रोजी पार उमर्टी येथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्याने तेथे त्यांना कर्तव्यासाठी पाठविण्यात आले होते. तेथे कारवाईसाठी जात असताना अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना रात्रीच लासूर येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले होते. त्यानंतर मध्यरात्री चोपडा उपजिल्हा रुग्णालयात आणले. दि. १६ रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाला. चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पीएसआय बापू साळुंखे करत आहेत.

Next Post
पाचोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

पाचोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह उत्साहात

June 24, 2026
बहिणाबाई ज्येष्ठ नागरिक महिला संस्थेतर्फे रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर
जळगाव जिल्हा

बहिणाबाई ज्येष्ठ नागरिक महिला संस्थेतर्फे रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

June 24, 2026
कचरा डेपोवर मनपाचा वजन काटा अखेर सुरू; उपमहापौर मनोज चौधरी यांच्या पाठपुराव्याला यश!
जळगाव जिल्हा

कचरा डेपोवर मनपाचा वजन काटा अखेर सुरू; उपमहापौर मनोज चौधरी यांच्या पाठपुराव्याला यश!

June 24, 2026
डॉ. प्रीतीश चौधरी ‘नियतीचे चक्र’ पुरस्काराने सन्मानित
जळगाव जिल्हा

डॉ. प्रीतीश चौधरी ‘नियतीचे चक्र’ पुरस्काराने सन्मानित

June 24, 2026
भोकर येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष मोनालिका पवार यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण
जळगाव जिल्हा

भोकर येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष मोनालिका पवार यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण

June 24, 2026
गोदावरी स्कूलमध्ये नर्सरी विभागाचे उत्साहात उद्घाटन; सुसज्ज वर्गखोल्या आणि अत्याधुनिक सुविधांवर भर
शैक्षणिक

गोदावरी स्कूलमध्ये नर्सरी विभागाचे उत्साहात उद्घाटन; सुसज्ज वर्गखोल्या आणि अत्याधुनिक सुविधांवर भर

June 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group