• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भीषण अपघात ; डंपरने ट्रॅक्टरला दिलेल्या धडकेत एक ठार, तीन जखमी

जळगाव शहरातील घटना : डिकसाई गावात मजूर कुटुंबावर शोककळा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 25, 2025
in जळगाव जिल्हा
0
भीषण अपघात ; डंपरने ट्रॅक्टरला दिलेल्या धडकेत एक ठार, तीन जखमी

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहरात अपघातांची मालिका अजून सुरूच आहे. शनिवार दि. २५ जानेवारी रोजी शहरातील छत्रपती शिवाजीनगर परिसरात दूध फेडरेशन जवळ विटा घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत एक तरुण जागीच ठार झाला तर ३ जण गंभीर जखमी झाल्याची घटना सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली आहे. घटनास्थळी शहर पोलिसांनी धाव घेतली असून डंपर ताब्यात घेतला आहे.

अंकुश आत्माराम भिल (वय-२७, रा. डिकसाई ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो गावामध्ये आई-वडील पत्नी, भाऊ, २ मुले, १ मुलगी यांच्यासह राहत असून हातमजूरी काम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. शनिवारी ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ एएन २९०६) ने अंकुश भील याच्यासह सुनील मधुकर भिल (वय-२२), गणेश भगीरथ भिल (वय-१८), आणि शुभम सुका भिल (वय -२०, तिघे रा. विदगाव ता. जळगाव) विटा घेऊन जात होते.

https://khandeshprabhat.com/wp-content/uploads/2025/01/Untitled-44_720p.mp4

जळगाव शहरातील दूध फेडरेशन जवळील भाग्यश्री पेट्रोल पंपाजवळून जात असताना तेथील वळण जवळ मागून येणाऱ्या भरधाव डंपरने ओव्हरटेक करत असताना ट्रॅक्टरला धडक दिली. तेवढ्यात चालकाचे नियंत्रण सुटून ट्रॅक्टर पलटी झाले. त्यामुळे ट्रॅक्टरवर बसलेला अंकुश भील हा ट्रॅक्टर खाली दाबला गेल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेले सुनील मधुकर भिल, गणेश भगीरथ भिल, शुभम सुका भिल हे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान घटनास्थळी नागरिकांनी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले होते. या घटनेची माहिती मिळताच जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच डंपर हा ताब्यात घेतला आहे. या घटनेबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. रुग्णालयात कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने व ३ मुले पितृप्रेमाला पोरकी झाल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Tags: #jalgaon_cityaccident
Next Post
जैन श्राविका मंडळाच्या अध्यक्षा पदी प्रतिभा जैन यांची निवड

जैन श्राविका मंडळाच्या अध्यक्षा पदी प्रतिभा जैन यांची निवड

ताज्या बातम्या

अमळनेरच्या तीन महिन्यांच्या बालिकेला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार!
आरोग्य

अमळनेरच्या तीन महिन्यांच्या बालिकेला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार!

June 2, 2026
वेस्ट टू एनर्जी: डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या ‘अन्नपुर्णालयम’मध्ये कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती!
जळगाव जिल्हा

वेस्ट टू एनर्जी: डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या ‘अन्नपुर्णालयम’मध्ये कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती!

June 2, 2026
भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी
जळगाव जिल्हा

भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी

June 2, 2026
जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर
जळगाव जिल्हा

जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर

June 1, 2026
मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा

मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा

May 31, 2026
जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण
कृषी

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण

May 31, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group