• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘तुमच्या कुत्र्याला आवरा’.. सांगितल्याच्या कारणावरून जबर मारहाण ; तिघे गंभीर जखमी

जळगाव शहरातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 17, 2025
in गुन्हे
0
‘तुमच्या कुत्र्याला आवरा’.. सांगितल्याच्या कारणावरून जबर मारहाण ; तिघे गंभीर जखमी

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील खेडी शिवारात असलेल्या कावेरी हॉटेल जवळील विद्या नगरात कुत्रा भुंकत आहे त्याला आवरा असे सांगितल्याच्या कारणावरून परिसरात राहणाऱ्या नागरीकांना दगड, लाकडी काठी आणि फरशीच्या तुकड्यांनी मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दि. १७ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली आहे. या मारहाणीत तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते. प्रकरणी तीन जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

शहरापासून जवळ असलेल्या खेडी शिवारातील कावेरी हॉटेल परिसरात असलेल्यास विद्या नगर येथे सोनी वाणी नामक महिलेचा कुत्रा हा नेहमी या परिसरात भूंकत असतो. परिसरात जाणाऱ्या येणाऱ्या आणि लहान मुलांवर धाव घेवून चावा घेण्याचा प्रयत्न करतो. यावर तीन दिवसांपुर्वी देखील महिलेला येथील नागरीकांनी समजावून सांगितले होते. दरम्यान, शुक्रवारी दि. १७ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता त्याच महिलेचा कुत्रा हा लहान मुलांवर धावून आला. त्यावर त्या महिलेला परिसरातील काही नागरिकांनी कुत्रा आवरण्याचे सांगितले. याचा राग आल्याने त्या महिलेने तिच्या ओळखीच्या पाच ते सहा गुंडांना घटनास्थळी बोलावून घेतले.

त्यावेळी गल्लीत उभे असलेले चंद्रकांत जीवराम चौधरी (वय-४०), किशोर अर्जुन पाटील (वय ४२) आणि चेतन लक्ष्मण खडसे (वय-३५,सर्व रा.विद्यानगर, जळगाव) या तिघांना दगड, लाकडी दांडका आणि फरशी मारून गंभीर दुखापत केली. तर त्यांच्या सोबत असलेल्या महिलांना देखील मारहाण केल्याचा आरोप जखमी झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी केला आहे. यावेळी या घटनेत परिसरातील नागरीकांच्या अंगावर देखील दगडफेक करण्यात आली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शनीपेठ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या तिघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. यात तीन व्यक्तींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते..

Tags: #jalgaon_cityCrime
Next Post
तुम्ही जर वीजमीटरमध्ये छेडखानी केली असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी..

तुम्ही जर वीजमीटरमध्ये छेडखानी केली असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी..

ताज्या बातम्या

लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी
गुन्हे

लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी

April 17, 2026
जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न
क्रिडा

जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न

April 16, 2026
जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप
जळगाव जिल्हा

जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप

April 16, 2026
जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश

April 16, 2026
जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा
जळगाव जिल्हा

जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा

April 16, 2026
आईला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम जेरबंद
गुन्हे

आईला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम जेरबंद

April 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group