• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

प्रकल्प स्तरीय विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 17, 2025
in शैक्षणिक
0
प्रकल्प स्तरीय विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न

जळगाव, (जिमाका) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल अंतर्गत प्रकल्प स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम दि. १५ जानेवारी २०२५ रोजी अमळनेर येथील पिंपळे तालूक्यातील अनुदानित आश्रम शाळेत संपन्न झाला. या प्रदर्शनात १७ शासकीय व ३४ अनुदानित आश्रम शाळांतील विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण व सर्जनशील उपकरणे सादर केली. यावेळी उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक असे तीन गट तयार करण्यात आले होते. ज्यात चार बीटमधून प्रत्येक गटातील सर्वोत्तम तीन उपकरणांना प्रदर्शनासाठी निवडण्यात आले. या प्रदर्शनात अनुक्रमे १४, १२ आणि २६ उपकरणांचा सहभाग होता.

या कार्यक्रमाचे उद्घाटन यावलचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या हस्ते झाले. उद्घाटनपर भाषणात अरुण पवार यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्याचे महत्त्व पटवून दिले आणि प्रयोगशीलता व नाविन्यपूर्णतेला चालना देण्याचे आवाहन केले. प्रकल्प स्तरीय विज्ञान प्रदर्शनातील विजेत्या विद्यार्थ्यांना इस्रो (ISRO) दौऱ्यावर नेले जाईल असे त्यांनी जाहिर केले.

समारोप व बक्षीस वितरण समारंभाचे अध्यक्षस्थान अनिल झोपे, प्राचार्य, डायट जळगाव यांनी भूषवले. यावेळी अनिल झोपे यांनी डायट जळगावच्या वतीने आदिवासी आश्रम शाळांसाठी शैक्षणिक मदत व सुधारणा यासाठी कायमस्वरूपी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तीनही गटातील प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या शाळांना स्टेट बँक ऑफ इंडिया, यावल यांच्या वतीने इन्सिनरेटर भेट देण्यात आले.

कार्यक्रमास भारतीय स्टेट बँकचे क्षेत्रीय व्यवस्थापक धर्मेंद्र कुमार सिंग, यावलचे शाखा व्यवस्थापक राधेश्याम ताराचंद मूंगमुळे, ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. सी. डी. साळुंखे, विद्या पाटील, युवराज पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे निरीक्षण व मूल्यांकन कार्य विज्ञान शिक्षक निरंजन पेंढारे, बी. बी. ठाकरे व डी. के. पाटील यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहा. प्रकल्प अधिकारी पवन पाटील व इतर अधिकारी व कर्मचारी शिक्षण विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल व अनुदानित आश्रम शाळा, पिंपळे यांच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.


 

Next Post
गॅस सिलिंडरसह ३१ हजारांचे साहित्य जप्त ; चाळीसगाव पोलिसांची कारवाई

भिंतीवर सेटअपबॉक्सची डिश लावण्याच्या कारणावरून आई व मुलाला बेदम मारहाण

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती
जळगाव जिल्हा

बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती

September 17, 2026
उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 
जळगाव जिल्हा

उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add