• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पानिपत शौर्य स्मारकाच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाचे सर्वोतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा साकारणार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 15, 2025
in महाराष्ट्र
0
पानिपत शौर्य स्मारकाच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाचे सर्वोतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली, (वृत्तसेवा) : मराठयांनी राष्ट्र संरक्षणार्थ पानिपतच्या युध्दात जीवाची बाजी लावून लढा दिला. या युद्धाच्या शौर्य स्मारकासाठी महाराष्ट्र शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल,अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पानिपत येथे दिली.

पानिपत युध्दाला २६४ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पानिपत येथील काला आम परिसरात मंगळवारी मराठा शौर्य दिनाचे आयोजन करण्यात आले. मराठा वीर योद्ध्यांना अभिवादन करण्यासाठी गत १९ वर्षांपासून पानिपत शौर्य समितीच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

याप्रसंगी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय क्रीडा तथा युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे राजशिष्टाचार तथा पणन मंत्री जयकुमार रावल, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, खासदार राजाभाऊ वाझे आणि हर‍ियाणा शासनाचे अधिकारी, स्थानिक नागर‍िक मोठया संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या युध्द मोहिमेतून त्याकाळी बरेच काही शिकता आले. त्यानंतर झालेल्या अनेक मोहिमा मराठयांनी जिकंल्याच नाही तर अटकेपर्यंत झेंडा फडकविला. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला जाती पातीपलीकडे देशासाठी लढण्याची दिलेली शिकवण मावळयांनी पाळली आणि म्हणून दिल्लीचे तख्त मराठयांनी एका काळी राखले. ही एकीची शिकवण कायम ठेवून विकसित महाराष्ट्र आणि भारत घडवूया असेही ते म्हणाले.

या स्मारकासाठी अधिकची जमीन आवश्यक असल्याने त्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल, असे नमूद करुन या परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळाही राज्य शासनातर्फे उभारला जाईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी केली. यासाठी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल समन्वयक म्हणून काम पाहतील, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री प्रतापराव जाधव आणि माजी मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनीही मनोगते मांडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पानिपत शौर्य समितीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी केले. यावेळी समितीच्यावतीने अमरावतीचे नितीन धांडे यांना शौर्यस्मारक पुरस्कार प्रदान करण्यातं आला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सशक्त भारत परिवार, मराठा सेवा संघ, हरियाणा समस्त धाणक मराठा समाज, धनुष्यधारी धानक समाज, मराठा उत्थान समिती, मुदगल चेतना परिवार चेरिटेबल ट्रस्ट छत्रपती शिवाजी महाराज वेलफेयर संघ, पानीपत सार्वजानिक मराठा गणेश मंडल, यांनी प्रयत्न केले.

Next Post
विधी सेवा महाशिबिर व शासकीय सेवा योजना महामेळाव्याचे आयोजन

विधी सेवा महाशिबिर व शासकीय सेवा योजना महामेळाव्याचे आयोजन

ताज्या बातम्या

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत
गुन्हे

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत

October 8, 2026
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर
आरोग्य

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर

October 8, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट

October 8, 2026
स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
खान्देश

स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

October 8, 2026
मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान
गुन्हे

मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान

October 8, 2026
उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड
खान्देश

उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड

October 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add