• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विधी सेवा महाशिबिर व शासकीय सेवा योजना महामेळाव्याचे आयोजन

नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 15, 2025
in जळगाव जिल्हा
0
विधी सेवा महाशिबिर व शासकीय सेवा योजना महामेळाव्याचे आयोजन

जळगाव, (जिमाका) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव आणि तालुका विधी सेवा समिती पाचोरा तसेच पाचोरा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा महाशिबिर व शासकीय सेवा योजना महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम “न्यायालय आपल्या दारी” या संकल्पनेवर आधारित आहे. येत्या रविवारी, दिनांक १९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता निर्मल इंटरनॅशनल स्कूल, अंतुर्ली, भडगाव रोड, पाचोरा येथे हे शिबिर संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी नुकतीच पाचोरा येथील दिवाणी न्यायालय येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दिवाणी न्यायाधीश जी.बी.औंधकर, सह दिवाणी न्यायाधीश एस.व्ही.निमसे, सह दिवाणी न्यायाधीश जी.एस.बोरा, तसेच वकील संघाचे अध्यक्ष अॅड. प्रविण पाटील व इतर वकील बांधव उपस्थित होते. या परिषदेत न्या.जी.बी. औंधकर यांनी पत्रकारांना कार्यक्रमाचे स्वरूप, उद्दिष्ट आणि महत्त्व याबद्दल सविस्तर माहिती दिली.

या पत्रकार परिषदेत न्या.औंधकर यांनी सांगितले की, “न्यायालय आपल्या दारी” या संकल्पनेच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांपर्यंत न्याय व शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. “शासन आपल्या दारी” योजनेच्या धर्तीवर नागरिकांना शासकीय योजनांचे लाभ सुलभपणे मिळावेत आणि त्यांना कायदेशीर सहाय्यही उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या महाशिबिराचे उद्घाटन पालक न्यायमूर्ती मंगेश एस. पाटील व पालक न्यायमूर्ती अभय एस. वाघवसे, उच्च न्यायालय, औरंगाबाद यांच्या हस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगावचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण एम. क्यु. एस. एम. शेख हे राहणार आहेत. या महाशिबिराचे अतिथी म्हणून जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि महाराष्ट्र बार कौन्सिलचे पालक सदस्य अॅड. अमोल सावंत उपस्थित राहणार आहेत.

विधी सेवा महाशिबिरामध्ये न्यायालयीन यंत्रणा व शासकीय योजना यांचा प्रभावी मेळ साधला जाणार आहे. या शिबिरामध्ये नागरिकांना विविध योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया, लाभ घेण्याच्या अडचणी आणि त्यावरील उपाय यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा व महाशिबिरासंदर्भातील अधिक माहितीसाठी व मार्गदर्शनासाठी वकील संघाचे प्रतिनिधी, तालुका विधी सेवा समिती सदस्य, तसेच शासकीय विभागांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


 

Next Post
रूद्राक्ष टीमचे कुटुंब नियोजन पथनाट्य ठरले प्रथम विजेते ; नर्सिंगचे द व्हाइटल व्हॉईस द्वितीय

रूद्राक्ष टीमचे कुटुंब नियोजन पथनाट्य ठरले प्रथम विजेते ; नर्सिंगचे द व्हाइटल व्हॉईस द्वितीय

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
खान्देश

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 22, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
खान्देश

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 22, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add