• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

समाज कल्याण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धांना प्रारंभ ‌

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 5, 2025
in क्रिडा
0
समाज कल्याण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धांना प्रारंभ ‌

जळगाव, (प्रतिनिधी) : राज्याच्या समाज कल्याण विभागात प्रथमच अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धांना प्रारंभ करण्यात आला आहे. सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरी मिसाळ,व प्रधान सचिव डॉ.हर्षदिप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व समाज कल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्या संकल्पनेतून अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

उत्तर महाराष्ट्राच्या नाशिक विभागीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांना दि. ४ रोजी जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात प्रारंभ झाला. दि. ४ व ५ या दोन दिवस चालणाऱ्या स्पर्धेत नाशिक, जळगाव, धुळे ,मुरबाड व अहिल्यानगर या पाच जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी सहभागी झाले आहेत‌. या स्पर्धांमध्ये सांघिक खेळांमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो, टेबल टेनिस, बॅडमिंटन, हॉलीबॉल, तर वैयक्तिक स्पर्धेमध्ये १०० मीटर, २०० मीटर धावणे, टेबल टेनिस, बॅडमिंटन, बुद्धिबळ, या खेळांचा समावेश आहे.

समाज कल्याण नाशिक विभागातील उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद, सर्व विशेष अधिकारी यांच्यासह विभागातील कर्मचारी सहभागी झाले आहेत. प्रादेशिक उपायुक्त कार्यालय नाशिक व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव ‌ यांच्या संयुक्त विद्यमाने सदर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

स्पर्धेचे उद्घाटन समाज कल्याण नाशिक विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजेश प्रियदर्शनी मुख्य प्रबंधक, स्टेट बँक ऑफ इंडिया जळगाव, उपायुक्त राकेश पाटील, उपायुक्त राकेश महाजन, सहाय्यक आयुक्त जळगाव योगेश पाटील, सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर,सहाय्यक आयुक्त प्रविण कोरगंटीवार, समाज कल्याण अधिकारी देविदास कोकाटे,संजय सैदाणे, राजेंद्र पाटोळे, जनसंपर्क अधिकारी शशिकांत पाटील, यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Next Post
मंत्री गिरीश महाजनांवर आ.एकनाथ खडसेंची तिखट प्रतिक्रिया

मंत्री गिरीश महाजनांवर आ.एकनाथ खडसेंची तिखट प्रतिक्रिया

ताज्या बातम्या

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
खान्देश

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

September 9, 2026
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक
गुन्हे

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक

September 9, 2026
अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
जळगाव जिल्हा

अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

September 9, 2026
७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला
गुन्हे

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

September 9, 2026
जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
गुन्हे

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 9, 2026
देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त
गुन्हे

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त

September 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add