• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

तेली समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात ७ विवाह जुळले तर विवाहेच्छुक युवक-युवतींनी दिला परिचय

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 29, 2024
in सामाजिक
0
तेली समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात ७ विवाह जुळले तर विवाहेच्छुक युवक-युवतींनी दिला परिचय

वधू-वर परिचय मेळाव्याचे मंत्री गुलाबराव पाटील, आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते उद्घाटन

जळगाव, (प्रतिनिधी) : येथील शारदा एज्युकेशन फाउंडेशन व श्री संत जगनाडे महाराज बहुद्देशीय संस्थेतर्फे रविवारी राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय मेळावा पार पडला. या तेली समाज मेळाव्यात ७ विवाह जुळले. तसेच मेळाव्यात १४०० हून अधिक विवाहेच्छुक युवक-युवतींनी नोंदणी करून परिचय करून दिला. विशेष बाब म्हणजे मेळाव्याच्या माध्यमातून जुळलेला एक आदर्श विवाह याच ठिकाणी पार पडला. नव वर-वधूला मान्यवरांनी शुभ आशीर्वाद दिले. शहरातील खान्देश सेंट्रल मॉल परिसरात आयोजित मेळाव्यामध्ये हजारोंच्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

यावेळी व्यासपीठावर पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आ. सुरेश भोळे (राजूमामा) यांच्यासह उद्योजक नंदू चौधरी, विनोद चौधरी, विजय चौधरी, धरणगावचे माजी नगराध्यक्ष संतोष चौधरी, सुरेश चौधरी, रामचंद्र चौधरी, निर्मला चौधरी, बबन चौधरी, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, दिंगबर चौधरी, शिवलाल चौधरी, माजी नगरसेवक दिंगबर चौधरी, ऍड. महेंद्र चौधरी, भास्कर चौधरी, मणिलाल चौधरी यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेले पदाधिकारी उपस्थित होते.

‘ब्रह्मगाठी’ वधू-वर परिचय पुस्तिकेचे प्रकाशन..
मान्यवरांच्या हस्ते ‘ब्रह्मगाठी’ या वधू-वर परिचय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. ही पुस्तिका संपूर्ण राज्यात व देशातील काही भागातदेखील वितरित होत असते. मेळाव्याला गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

असे आदर्श विवाह अन्य समाजातही व्हावे.. – मंत्री गुलाबराव पाटील
समाजात पैसे खर्च करून मोठा विवाह करण्याची एक प्रथा पडली आहे. या प्रथेला तडा देत या नव वर-वधुनी समाजात एक नवीन ओळख निर्माण केली आहे. असा आदर्श विवाह इतर समाजातही व्हावे, असे आवाहन मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. तसेच त्यांनी नव वर-वधु यांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

समाजापासून कधीही दूर जाऊ नका.. – आ. सुरेश भोळे
प्रत्येक समाजाने काळानुसार बदल करून सामाजिक विवाह सोहळ्यात सहभागासाठी होण्यासाठी पुढे यायला पाहिजे. पतंगाप्रमाणे आयुष्यात तुम्ही कितीही वर जा, मात्र ज्या समाजाने आपल्याला घडविले, मोठे केले, ओळख दिली. त्या समाजापासून कशीही दूर जाऊ नका, असे आमदार सुरेश भोळे यांनी यावेळी सांगितले.

प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष प्रशांत सुरळकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन विशाल पाटील यांनी केले. सूत्रसंचालन सरिता खाचणे यांनी केले. यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष बबन चौधरी, सचिव रामचंद्र चौधरी, संदीप चौधरी, अमोल चौधरी, योगराज चौधरी, डॉ. दीपक चौधरी आदींनी परिश्रम घेतले.

 


 

Next Post
परिवर्तनच्या महोत्सवाने जळगाव सांस्कृतिक केले.. – आ.राजूमामा भोळे

परिवर्तनच्या महोत्सवाने जळगाव सांस्कृतिक केले.. - आ.राजूमामा भोळे

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती
जळगाव जिल्हा

बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती

September 17, 2026
उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 
जळगाव जिल्हा

उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add