• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रस्त्यावर मका टाकल्याने दुचाकी घसरून झाला विचित्र अपघात

अपघातात शालक-पाहुणा ठार, तर दोघे गंभीर जखमी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 13, 2024
in जळगाव जिल्हा
0
रस्त्यावर मका टाकल्याने दुचाकी घसरून झाला विचित्र अपघात

जामनेर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील सोनाळा फाट्याजवळ रस्त्यावर टाटा ४०७ टेम्पो पलटी झाल्याने त्याखाली दुचाकीवरील तिघेजण दाबले गेले. या भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला असून तिसऱ्यावर जळगाव येथे उपचार सुरू आहेत. तर टेम्पो चालकदेखील जखमी झाला आहे. या प्रकरणी पहूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रघुनाथ विठ्ठल चौधरी (वय ४२ रा. शेंदुर्णी ता. जामनेर) असे फिर्यादीचे नाव आहे. त्यांचा पुतण्या मयूर गणेश चौधरी (वय २५) आणि मयूरचे दाजी शंकर भगवान चौधरी (वय ३५ रा. माणिक नगर, धुळे) व त्यांच्यासोबत मयूर देवेंद्र गढरी (वय २४ रा. शेंदुर्णी) असे तिघेजण ११ डिसेंबर रोजी दुचाकी (एमएच १९ बीआर २१२६) ने जामनेरला गेले होते. तेथून रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घरी परत जात असताना सोनाळा फाट्याच्या पुढे सोनाळा शिवारात पहुर कडून जामनेरकडे जात असलेल्या टाटा ४०७ टेम्पो क्रमांक (एमएच २०डीइ ४३१३) हा पलटी झाल्याने त्याखाली दुचाकी वरील मयूर चौधरी व त्याचे दाजी शंकर चौधरी यांचेसह मयूर गढरी हे दाबले गेले.

त्यात मयूर आणि शंकर चौधरी हे जागेवर मयत झाले तर मयूर गढरी याला गंभीर जखमी झाल्याने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, टेम्पो चालक शेख सलीम शेख याकूब (रा. शिवना ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर) हा देखील गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, सदर रस्त्यावर व्यापारी पंकज प्रकाशचंद लोढा यांनी वाळवण्यासाठी निष्काळजीपणाने मका टाकून ठेवला होता. या मक्यामुळे मयूर चौधरी याची मोटरसायकल घसरून ते खाली पडले आणि समोरून भरधाव वेगात येणारी टाटा ४०७ ही वळण घेताना पलटी झाली.

त्याखाली जखमी दाबले गेले व त्यात मयत झाले. त्याकरिता सदर मका टाकणारा व्यापारी पंकज लोढा आणि टेम्पो चालक शेख सलीम शेख हे मरणास कारणीभूत असल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. फिर्यादीनुसार पहुर पोलीस स्टेशन येथे दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरीक्षक सचिन सानप हे तपास करीत आहेत. दरम्यान, मका टाकणाऱ्या व्यापाऱ्याला पोलिसांनी यापूर्वी दोन वेळा समज दिली होती. मात्र व्यापाऱ्याने पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्याने दोन बळी गेले आहे.


Next Post
हृदयावरील ‘तावी’ किचकट शस्त्रक्रिया जळगावमधील ऑर्किड हॉस्पिटल येथे यशस्वी

हृदयावरील 'तावी' किचकट शस्त्रक्रिया जळगावमधील ऑर्किड हॉस्पिटल येथे यशस्वी

ताज्या बातम्या

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता
क्रिडा

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता

July 12, 2025
राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
जळगाव जिल्हा

राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

July 12, 2025
आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप
जळगाव जिल्हा

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप

July 12, 2025
जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 12, 2025
जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव
जळगाव जिल्हा

जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव

July 11, 2025
पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
जळगाव जिल्हा

पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 11, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group