• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पर्ससह अडीच लाख लंपास करताना तीन भामटे जेरबंद

चाळीसगाव रेल्वे स्थानकावरील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 11, 2024
in गुन्हे
0
पर्ससह अडीच लाख लंपास करताना तीन भामटे जेरबंद

चाळीसगाव, (प्रतिनिधी) : चाळीसगाव रेल्वे स्थानकावरुन एक महिला प्रवास करीत रेल्वे गाडीत चढत असताना, गर्दीचा फायदा घेत, तीन भामट्यांनी तिच्या पर्ससह अडीच लाख रुपये लंपास केले होते. याप्रकरणी चाळीसगाव रेल्वे पोलिस स्थाकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रेल्वे पोलिसांनी शिताफीने तिघा भामट्यांना जेरबंद केले आहे. रेल्वे पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतूक होत आहे.

शितल कैलास पाखले रा. चाळीसगाव ह्या धुळे-मुंबई रेल्वेमध्ये चढत असताना, गर्दीचा फायदा घेत त्यांच्या खांद्यावर लटकवलेली लेडीस पर्ससह दोन लाख पन्नास हजार रुपये व आधार कार्ड, पॅनकार्ड व मोटरसायकलची चाबी असा मुद्देमाल गर्दीत चोरीला गेला. त्यावरून लोहमार्ग पोलिस ठाणे चाळीसगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्यात सीसीटीव्ही फुटेज चेक करून व गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरुन लोहमार्ग पोलिस ठाणे चाळीसगाव येथील पोलिस उपनिरीक्षक सुधाकर मोहिते, श्रेणी पीएसआय अनंत रेणुके पो.ना पंकज पाटील, मोसिन अली सय्यद, फरीद तडवी यांनी रेल्वे सुरक्षा बल चाळीसगाव येथील टिम-पी.डी. पाटील उप निरीक्षक, किशोर चौधरी, आरक्षक रेहान अहमद, गोविंद राठोड यांचे मदतीने संशयित आरोपी यांचा शोध घेतला.

पोलिस अधीक्षक स्वाती भोर, उप विभागीय पोलिस अधिकारी सूर्यकांत बांगर, प्रभारी अधिकारी सुरेश भाले, रेल्वे सुरक्षा बल येथील अधिकारी चित्रेश जोशी, विभागीय सुरक्षा आयुक्त राजेशकुमार केसरी मनमाड, अतुल टोके निरीक्षक आदिंच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

संशयित आरोपी अर्जुन उर्फ गोल्ट्या कानिफनाथ भोसले (वय २५) वर्षे रा. मारोती मंदिराजवळ धारनंगाव ता. कोपरगाव जिल्हा अहमदनगर), अक्षय बाळासाहेब नन्नावरे (वय २३ वर्षे, रा. मारोती मंदिराजवळ धारनंगाव ता. कोपरगाव जिल्हा अहमदनगर), विधीसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेतले.

त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले २ लाख १९ हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आले आहे. संशयित आरोपी यांना अटक केली असून विधीसंघर्षग्रस्त बालक यांची आजी यांना समजपत्र देवून विधीसंघर्षग्रस्त बालक यास ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Next Post
पत्रकाराचा कॅमेरा हिसकावल्याप्रकरणी मनपाच्या सहाय्यक आयुक्तांविरोधात गुन्हा दाखल

पत्रकाराचा कॅमेरा हिसकावल्याप्रकरणी मनपाच्या सहाय्यक आयुक्तांविरोधात गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

बिल पास करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच ! एसीबीने रंगेहात पकडले; गुन्हा दाखल
खान्देश

बिल पास करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच ! एसीबीने रंगेहात पकडले; गुन्हा दाखल

October 16, 2025
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!.. पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; सहा आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त
खान्देश

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!.. पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; सहा आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त

October 16, 2025
संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श
कृषी

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

October 14, 2025
जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित
खान्देश

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित

October 14, 2025
अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
खान्देश

अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

October 14, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group