पारोळा, (प्रतिनिधी) : तालुक्यातील खेडीढोक येथील १९ वर्षीय तरुण शेतकऱ्याने त्याच्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हितेश विजयसिंग पाटील असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. हितेश याने त्याच्या खेडीढोक शिवारातील शेतात विष प्राशन केले. यासंदर्भात ग्रामस्थांना महिती कळताच त्यांनी हितेश पाटील यास अमळनेर येथील रूग्णालयात दाखल केले. मात्र त्याची तब्येत खालावल्याने त्याला कुटीर रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.
हितेश याला कुटीर रुग्णालयात दाखल केले असता रात्री ८:३० वाजेच्या सुमारास त्याला मयत घोषित करण्यात आले. यावेळी परिवाराने शोक व्यक्त केला. याबाबत पारोळा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेकॉ. कैलास साळुंखे करीत आहेत.