• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे आज उद्घाटन

शेतमजुरीला पर्यायी कृषी यंत्र ठरणार आकर्षण

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 29, 2024
in कृषी, जळगाव जिल्हा
0
अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे आज उद्घाटन

जळगाव, (प्रतिनिधी) : कृषी विस्ताराच्या कार्यात गेल्या नऊ वर्षांपासून प्रभावीपणे कार्य करणार्‍या अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे शहरातील एकलव्य क्रीडा संकुल, एम. जे. कॉलेज येथे २९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते शुक्रवारी (२९ नोव्हेंबर) रोजी दुपारी १ वाजता होणार आहे. निर्मल सीड्सचे डॉ. जे. सी. राजपूत, प्लॅन्टो कृषीतंत्रचे स्वप्नील चौधरी, नमो बायोप्लांटचे पार्श्व साभद्रा, ओम गायत्री नर्सरीचे मधुकर गवळी, कृषीदूतचे डॉ. रामनाथ जगताप यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.

शेतकऱ्यांना शेतमजूर ही समस्या सध्या सर्वात जास्त भेडसावत आहे. हे लक्षात घेऊन यंदाच्या प्रदर्शनात कृषी यंत्र व अवजारांचे तब्बल ४० हून अधिक तर एकूण २०० पेक्षा अधिक स्टॉल्स असतील. २९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यानच्या या चार दिवसीय तंत्रज्ञानावर आधारीत या कृषी प्रदर्शनाचा शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अ‍ॅग्रोवर्ल्डचे संचालक शैलेंद्र चव्हाण यांनी केले आहे.

बदलते हवामान, मजूर टंचाई, अद्ययावत तंत्रज्ञान, करार शेती, कमी पाण्यात येणारी पिके अशा शेतकर्‍यांची मागणी व गरजेवर आधारित मांडणी हे या प्रदर्शनाचे आकर्षण ठरणार आहे. क्षारमुक्त पाण्याचा (RO) वापर करून वाढवा शेतीचे उत्पादन, झटका मशीन, सोलर वरील शेतीपंपाचा डेमो यासह शासनाचा कृषी विभाग बँक शेतीविषयक पुस्तके एकाच छताखाली उपलब्ध असतील. शहरी शेती अर्थात टेरेस गार्डन तसेच घरगुती बागेसाठी उपयुक्त साधने, किचन-गार्डनिंग टूल्सही या प्रदर्शनात उपलब्ध असतील.

मोफत भाजीपाला बियाणे व आरोग्य तपासणी..
निर्मल सीड्सतर्फे पहिल्याच दिवशी प्रदर्शनास येणाऱ्या पहिल्या पाच हजार शेतकऱ्यांना भाजीपाला बियाणे सॅम्पल पाकीट मोफत देण्यात येईल. त्याचबरोबर गोदावरी फाउंडेशनतर्फे पुरुष तसेच महिला शेतकऱ्यांसाठी प्रदर्शन स्थळीच प्राथमिक आरोग्य तपासणी चारही दिवस मोफत असेल, असेही आयोजकांनी सांगितले.

Next Post
एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला भीषण अपघात ; ८ प्रवासी ठार, २० जखमी

एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला भीषण अपघात ; ८ प्रवासी ठार, २० जखमी

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता

September 10, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
गुन्हे

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

September 9, 2026
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक
गुन्हे

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक

September 9, 2026
अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
जळगाव जिल्हा

अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

September 9, 2026
७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला
गुन्हे

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

September 9, 2026
जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
गुन्हे

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add