• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

धक्कादायक, १४ वर्षीय मुलाची गळफास लावून घेत आत्महत्या..!

जळगाव शहरातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 25, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
धक्कादायक, १४ वर्षीय मुलाची गळफास लावून घेत आत्महत्या..!

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील गणेश कॉलनी परिसरातील १४ वर्षीय मुलाने गळफास लाऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवार दि. २५ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास उघड झाली आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

ओम उर्फ साई पंडित चव्हाण (वय १४) असे मयत बालकाचे नाव आहे. तो आई-वडील, बहिण यांच्यासह राहत होता. ओमचे वडील पंडित चव्हाण हे ब्रोकरचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत आहे. दरम्यान सोमवार दि. २५ नोव्हेंबर रोजी दुपारी घरी ओम हा एकटाच असताना त्याने छताला गळफास लावून घेत आत्महत्या केली. दुपारी ४ वाजेच्या सुमारास वडील घरी आले असता त्यांना दरवाजा बंद दिसला.

त्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता ओम चव्हाण हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. यावेळी पित्याने एकच हंबरडा फोडला. नातेवाईकांनी ओमचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. ओम चव्हाण हा इयत्ता नववीचा विद्यार्थी होता. त्याने आत्महत्या का केली याबाबत कारण अजून अस्पष्ट आहे. दरम्यान जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे कर्मचाऱ्यांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

Next Post
मतदान फोडल्याच्या समजुतीवरून वृद्धाला मारहाण

मतदान फोडल्याच्या समजुतीवरून वृद्धाला मारहाण

ताज्या बातम्या

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य
आरोग्य

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य

June 6, 2026
‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!
जळगाव जिल्हा

‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
कृषी

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

June 6, 2026
फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन
कृषी

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

June 5, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन
आरोग्य

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन

June 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group