• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शेंदुर्णीतील रथोत्सवात मंत्री महाजन, खोडपे सर यांची उपस्थिती

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 16, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
शेंदुर्णीतील रथोत्सवात मंत्री महाजन, खोडपे सर यांची उपस्थिती

विठ्ठलाचे दर्शन घेऊन गिरीश महाजन व खोडपे सरांनी विजयासाठी घातले साकडे

किरण चौधरी | जामनेर, (प्रतिनिधी) : खान्देशचे प्रति पंढरपूर म्हणून ओळख असणाऱ्या शेंदुर्णी नगरीत संतश्रेष्ठ कडोजी महाराज यांनी प्रारंभ केलेला विठ्ठल रुक्मिणी २८० वा रथोत्सव व यात्रोत्सव सोहळा शुक्रवारी साजरा करण्यात आला. यानिमित्त सध्या सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीतील प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपाचे गिरीष महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दिलीप खोडपे सर हे एकाच वेळी दर्शनासाठी आले. यावेळी त्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेऊन विजयासाठी साकडे घातले.

रथाची ब्रम्हवृंदांच्या मंत्र घोषात संतश्रेष्ठ कडोजी महाराज संस्थानचे ८ वे गादी वारस ह.भ.प. शांताराम महाराज भगत, मंत्री गिरीष महाजन, माजी जि. प. अध्यक्ष दिलीप खोडपे सर, प्रवीण गरुड, भाजपचे नेते संजय गरुड, सरोजिनी गरुड, गोविंद अग्रवाल, अमृत खलसे, माजी नगराध्यक्षा विजया खलसे आदी मान्यवरांच्या हस्ते सकाळी ११ वाजता महापूजासह आरती करण्यात आली. १७४४ च्या कार्तिक शुद्ध वैकुंठ चतुर्दशीला प्रारंभ झालेल्या रथोत्सवाचा वारसा आजही भक्तिभावाने साजरा केला जातो. त्रिविक्रम भगवान यांच्या रथाचे मनोभावे पूजन केले गेले. हजारो भक्तांच्या उपस्थितीत हा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

रथोत्सवानिमित्त शेंदुर्णीत भरते पंधरा दिवस यात्रा…
सोन नदीच्या काठावर रथोत्सवानिमित्त भव्य यात्रा भरली आहे. त्यात हॉटेल्स, करमणुकीचे खेळ, विविध दुकाने, सिनेमागृहे, तमाशा मंडळे असून १५ दिवस मोठी यात्रा भरत असते. यात्रेत लाखों रुपयांची उलाढाल होत असते. नौकरी, व्यवसाय आणि शिक्षणानिमित्त बाहेरगावी असणारे शेंदुर्णीकर आवर्जुन यात्रेला उपस्थित राहतात.

यात्रा उत्सवाचा आनंद भाविक भक्तांनी गुण्या गोविंदाने घ्यावा तसेच निवडणुकीचा माहोल असल्याने प्रशासनावर ताण येईल असे कृत्य कोणीही करू नये असे आवाहन संतश्रेष्ठ कडोजी महाराज संस्थानचे ह.भ.प. शांताराम महाराज भगत, शेंदुर्णी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विवेक धांडे, पहुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्यासह ग्रामस्थांनी केले आहे.


 

Next Post
‘विजयी भव’चे ग्रीटिंग कार्ड देऊन चिमुरडीचे अनोखे प्रेम

'विजयी भव'चे ग्रीटिंग कार्ड देऊन चिमुरडीचे अनोखे प्रेम

ताज्या बातम्या

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
खान्देश

जळगाव जिल्ह्यात गळफास घेतल्याने तिघांचा मृत्यू; शिरसोली, वडाळा-वडाळी आणि मुंदखेडा येथील घटना

October 17, 2026
मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत
गुन्हे

मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत

October 17, 2026
जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add