• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘भारत माता कि जय’ घोषणांनी रॅलीमध्ये प्रफुल्लित वातावरण

आ. राजूमामा भोळेंनी तुकाराम वाडी, जानकी नगर, कासमवाडी भागात साधला संवाद

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 9, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
‘भारत माता कि जय’ घोषणांनी रॅलीमध्ये प्रफुल्लित वातावरण

जळगाव, (प्रतिनिधी) : महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्या प्रचारार्थ पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शनिवारी संध्याकाळी दुसऱ्या टप्प्यात तुकारामवाडी, जानकी नगर, गणेशवाडी मार्गे पंचमुखी हनुमान मंदिर येथे संवाद रॅली काढली. या रॅलीला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. ‘भारत माता कि जय’, ‘महायुतीचा विजय असो’ अशा विविध घोषणांनी आणि जल्लोषाने रॅली मार्गातील वातावरण प्रफुल्लित झालेले होते. नागरिकांच्या या उत्साहाने आणि समर्थनाने आ. राजूमामा भोळे यांनी शहरात जनकल्याणाची कामे अधिक जोमाने करण्याचा निर्धार व्यक्त केला.

शनिवारी दुसऱ्या टप्प्यात पांडे डेअरी चौकातील रामदेव बाबा मंदिर येथे दर्शन घेऊन आ. भोळे यांनी भेटींना सुरुवात केली. तेथून तुकाराम वाडी, महादेव मंदिर परिसर, जानकी नगर, गणेशवाडी, मंजुषा हौसिंग सोसायटी, कासम वाडी मार्गे पंचमुखी हनुमान मंदिर येथे समारोप करण्यात आला. रॅलीदरम्यान आ. भोळे यांनी महेश पाटील, शांताराम सूर्यवंशी, वृत्तपत्र विक्रेते विलास वाणी आदींच्या घरी भेटी दिल्या. तसेच, जानकी नगरात मोठे भाऊ अरुण भोळे यांनी त्यांना गोड दही खाऊ घालून विजयासाठी आशीर्वाद दिले.

रॅलीमध्ये खा. स्मिता वाघ, महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, मंडळ क्रमांक ७ चे अध्यक्ष गोपाल पोपटानी, माजी नगरसेवक मंगला चौधरी, शिवसेनेचे माजी नगरसेवक कुंदन काळे, ॲड.शुचिता हाडा, मनोज आहुजा, माजी महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, प्रदीप रोटे, मंडळ सरचिटणीस विनय केसवानी, महेश पाटील, संदीप बाविस्कर, योगेश बागडे, हेमंत जोशी, प्रसन्न बागल, भूषण काकडे, विजय पाटील, दिनेश प्रजापत, सौरभ महाजन, सुशील जगताप, पंकज गागडे, नंदिनी दर्जी, कल्पना मावळे, उषा परदेशी, ज्ञानेश्वरी कांडेलकर, शिवसेनेचे पियुष कोल्हे, स्वप्नील परदेशी, उमेश सोनवणे, अमर ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अर्चना कदम, ममता तडवी, रिपाई आठवले गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, प्रताप बनसोडे, मिलिंद अडकमोल, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजू मोरे, महानगर जिल्हाध्यक्ष कल्पेश मोरे, लोकजनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Next Post
बी.जे.मार्केट मधील व्यापाऱ्यांसोबत डॉ.अनुज पाटलांनी साधला संवाद

बी.जे.मार्केट मधील व्यापाऱ्यांसोबत डॉ.अनुज पाटलांनी साधला संवाद

ताज्या बातम्या

जळगावात भाजपचा जल्लोष; ‘झालमुडी’चा आस्वाद घेत साजरा केला बंगाल-आसाममधील विजय!
राजकीय

जळगावात भाजपचा जल्लोष; ‘झालमुडी’चा आस्वाद घेत साजरा केला बंगाल-आसाममधील विजय!

May 4, 2026
शस्त्रास्त्र तस्करी अन् अवैध वाहतुकीला ‘ब्रेक’; जळगाव पोलिसांची रात्रीची धडक कारवाई; ७० बसेसची तपासणी
गुन्हे

शस्त्रास्त्र तस्करी अन् अवैध वाहतुकीला ‘ब्रेक’; जळगाव पोलिसांची रात्रीची धडक कारवाई; ७० बसेसची तपासणी

May 4, 2026
पांढऱ्या काविळीचे संकट हरले, डॉक्टरांच्या जिद्दीने मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ठरली यशस्वी
आरोग्य

पांढऱ्या काविळीचे संकट हरले, डॉक्टरांच्या जिद्दीने मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ठरली यशस्वी

May 4, 2026
जळगाव सी.ए. शाखेत ३ दिवसीय ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ कोर्स संपन्न; सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शैक्षणिक

जळगाव सी.ए. शाखेत ३ दिवसीय ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ कोर्स संपन्न; सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

May 4, 2026
अनुभूती निवासी स्कूलची निकालात बाजी; सलग १९ व्या वर्षी १०० टक्के यशाची परंपरा कायम
जळगाव जिल्हा

अनुभूती निवासी स्कूलची निकालात बाजी; सलग १९ व्या वर्षी १०० टक्के यशाची परंपरा कायम

May 3, 2026
पाचोऱ्याच्या कमलेश सोनवणेचा ‘जिल्हा युवा पुरस्कारा’ने गौरव; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
जळगाव जिल्हा

पाचोऱ्याच्या कमलेश सोनवणेचा ‘जिल्हा युवा पुरस्कारा’ने गौरव; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

May 3, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group