• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

केळी विकास महामंडळाच्या स्थापनेसाठी रोहिणी खडसे बहुमताने विजयी होणार !

शिवसेना उबाठा गटाचे तालुकाध्यक्ष अविनाश पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 7, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
केळी विकास महामंडळाच्या स्थापनेसाठी रोहिणी खडसे बहुमताने विजयी होणार !

मुक्ताईनगर, (प्रतिनिधी) : मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीच्या मुक्ताईनगर मतदारसंघाच्या उमेदवार रोहिणी एकनाथराव खडसे यांनी प्रचार दौऱ्या निमित्त ग्रामस्थांना दिली. रावेर तालुक्यातील वाघाडी, धामोडी, रेंभोटा, कांडवेल, कोळोदा, निंबोल, सुलवाडी, शिंगाडी, ऐनपूर, विटवे, सांगवे गावात प्रचार रॅली काढून मतदारांच्या भेटी घेऊन त्यांनी मतदारांचे आशीर्वाद घेतले. यावेळी सुवासिनींनी औक्षण करून ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत गावागावात रोहिणी खडसे यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी बोलतांना रोहिणी खडसे म्हणाल्या, ‘तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने आणि आ. एकनाथराव खडसे, रविंद्रभैय्या पाटील, अरुण पाटील, राजाराम महाजन आणि जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवार म्हणुन हि निवडणूक लढवत असुन मतदारसंघातील शेतकरी, कष्टकरी, महिला युवकांचे प्रश्न विधिमंडळात मांडुन त्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि मुक्ताईनगर मतदारसंघाचा शाश्वत विकास करण्यासाठी मतदानरुपी आशिर्वाद देण्याची विनंती करून गेले तीस वर्षात मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना आ.एकनाथराव खडसे यांनी मतदारसंघाचा जो विकास केला तोच विकासाचा वसा, वारसा पुढे अखंडितपणे चालवण्याची ग्रामस्थांना रोहिणी खडसे यांनी ग्वाही दिली.

यावेळी शिवसेना उबाठा गटाचे तालुकाध्यक्ष अविनाश पाटील मतदारांशी संवाद साधताना म्हणाले कि, आ. एकनाथराव खडसे यांनी तीस वर्ष मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना जाती पाती विरहित जनहिताचे राजकारण करत असताना मतदारसंघातील सामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकरी यांना केंद्रबिंदू मानुन मतदारसंघाचा सर्वांगिण विकास केला. केळी उत्पादनात अग्रेसर असलेल्या आपल्या भागातील केळी उत्पादक शेतकरी बांधवांना फायदा व्हावा, यासाठी कृषीमंत्री असताना शेतकरी हिताचे निर्णय घेतले केळी पिक विमा योजना लागू करून त्यातील जाचक अटी रद्द केल्या ज्याचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना फायदा झाला. केळी विकास महामंडळाची स्थापना करून केळी उत्पादक शेतकऱ्यांना विविध सोयी उपलब्ध करून देण्यासाठी रोहिणीताई खडसे यांना बहुमताने विजयी करण्याचे अविनाश पाटिल यांनी मतदारांना आवाहन केले.

यावेळी रविंद्र भैय्यासाहेब पाटील यांनी रोहिणी खडसे यांचा मागिल निवडणुकीत पराभव झाला तरी गेले पाच वर्षे त्या मतदारसंघातील जनतेच्या सुख दुःखात सहभागी झाल्या. मतदारसंघातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी पाठपुरावा, आंदोलने केली जनतेच्या प्रश्नांची जाण असलेल्या उच्चशिक्षित असलेल्या रोहिणीताई खडसे यांना प्रचंड बहुमताने विजयी करून आपल्या हक्काची लोकप्रतिनिधी म्हणून रोहिणीताई खडसे यांना विधानसभेत पाठवा असे रविंद्रभैय्या पाटिल यांनी मतदारांना आवाहन केले. यावेळी प्रचार रॅलीला मिळालेला नागरिकांचा व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता रोहिणी खडसे या निवडणुकीत विजयी होतील.

यावेळी जेष्ठ नेते रविंद्रभैय्या पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, निवृत्ती पाटील, शिवसेना (उबाठा) अविनाश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तालुकाध्यक्ष किशोर पाटील, माजी पं स सदस्य दिपक पाटील, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, सचिन महाले, सुनील कोंडे, पवन चौधरी, अमोल महाजन, शशांक पाटील, किशोर पाटील, मंदार पाटील, रविंद्र महाजन, रवींद्र पाटील, श्रीकांत चौधरी, भागवत कोळी, अरविंद पाटील, मधुकर पाटील, सुमित सावरने, मनोज गोसावी, सलमान खान,मेहमूद शेख, हैदर अली,नितीन पाटील,दीपक पाटील सर,केतन पाटिल,उज्वल पाटील,सोनू पाटील,संजय पाटील,परेश गोसावी,राजेंद्र चौधरी,मधुकर पाटील,अर्चना पाटील,चेतन पाटील,भूषण पाटील,सुरेश कोळी, गणेश देवगिरीकर,रोहन चऱ्हाटे,सागर मराठे , रविंद्र पाटील,वसंत पाटील, लखन पाटील,निलेश पाटील,शिवा पाटील,जगन्नाथ पाटील,किशोर कचरे, किशोर भवरे, सुनील पाटील, संतोष कचरे,मयूर पाटील,प्रभाकर पाटील,राजेंद्र जुमाले,कैलास ठाकरे, अशोक पाटील,गुलाब कचरे, सोपान वाघ,विक्की पाटील, जीवन पाटील,अतुल बोरसे उपस्थित होते.


 

Tags: #political
Next Post
आ.मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव शहरात नागरिकांची साधला संवाद

आ.मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव शहरात नागरिकांची साधला संवाद

ताज्या बातम्या

राज्यातील २९ महापालिकांच्या महापौर आरक्षणाची सोडत २२ जानेवारीला; मंत्रालयात रंगणार ‘आरक्षण’ नाट्य
खान्देश

राज्यातील २९ महापालिकांच्या महापौर आरक्षणाची सोडत २२ जानेवारीला; मंत्रालयात रंगणार ‘आरक्षण’ नाट्य

January 19, 2026
जिल्हा परिषदेच्या ४ कर्मचाऱ्यांचे निलंबन; दिव्यांग प्रमाणपत्रात आढळली तफावत
खान्देश

जिल्हा परिषदेच्या ४ कर्मचाऱ्यांचे निलंबन; दिव्यांग प्रमाणपत्रात आढळली तफावत

January 19, 2026
जैन इरिगेशनच्या कृषी महोत्सवास शेतकऱ्यांचा प्रतिसाद
कृषी

जैन इरिगेशनच्या कृषी महोत्सवास शेतकऱ्यांचा प्रतिसाद

January 19, 2026
राष्ट्रीय योगासन स्पर्धेत आर्टिस्टिक पेअरमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
क्रिडा

राष्ट्रीय योगासन स्पर्धेत आर्टिस्टिक पेअरमध्ये महाराष्ट्र आघाडीवर

January 18, 2026
चोपड्याच्या जिरायत पाडा येथे अंनिसतर्फे चमत्कारांचे सादरीकरण, प्रबोधन
जळगाव जिल्हा

चोपड्याच्या जिरायत पाडा येथे अंनिसतर्फे चमत्कारांचे सादरीकरण, प्रबोधन

January 18, 2026
एसटी प्रशासनाचा ‘रामभरोसे’ कारभार; डोळ्यासमोर बस असूनही चौकशी खिडकीतून प्रवाशांची दिशाभूल!
खान्देश

एसटी प्रशासनाचा ‘रामभरोसे’ कारभार; डोळ्यासमोर बस असूनही चौकशी खिडकीतून प्रवाशांची दिशाभूल!

January 18, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group