• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

“गुलाबभाऊंचा आदिवासी बांधवांकडून ‘धनुष्यबाण’ देऊन सन्मान

शेतकऱ्यांसह भव्य बैलगाडी प्रचार रॅलीने शक्तिप्रदर्शन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 7, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
“गुलाबभाऊंचा आदिवासी बांधवांकडून ‘धनुष्यबाण’ देऊन सन्मान

धरणगाव / जळगाव, (प्रतिनिधी) : शिवसेनेचे नेते आणि महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांचा आदिवासी बांधवांनी ‘धनुष्यबाण’ देऊन सन्मान केला. हा सन्मान त्यांच्या सततच्या जनसंपर्कातल्या घनिष्ठतेचे आणि जनतेसाठी केलेल्या कार्याचे प्रतीक मानले जात आहे. बिलखेडा येथे शेकडोआदिवासी बांधवांनी व शेतकऱ्यांनी धनुष्यबाण भेट देवून तसेच शिवसेनेचे झेंडे आणि कट-आउट्सने सजविलेल्या बैलगाडीत गुलाबभाऊंना उभे करून भव्य प्रचार रॅली काढण्यात आली.

विकासाचे व्हिजन म्हणजे धनुष्यबाण” साठी शेतकरी व आदिवासीं बांधव यावेळी एकवटलेचे दिसून आले. बोरगाव बु. येथे ३२ केव्हीचे वीज उपकेंद्र उभारण्यात आल्याने परिसरातील वीज समस्या कायमस्वरूपी सुटली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी नागिन नदीवर १.७५ कोटी रुपयांचे क्रॉसिंग पूल उभारण्यात आल्याने संपूर्ण परिसरातील शेतकरी व नागरिकांना फायदा झाला आहे. त्याचबरोबर विविध ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालये आणि अन्य विकास कामे प्रभावीपणे राबविण्यात आल्यामुळे शेतकरी वर्गाने उत्स्फूर्तपणे गुलाबराव पाटील यांच्या बाजूने समर्थन दर्शवले. गुलाबभाऊंना गावोगावी जोरदार पाठिंबा मिळत आहे.

गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वातील विकास कामांमुळे ग्रामीण भागातील जनतेचा त्यांच्यावर असलेला विश्वास आणि प्रेम उघडपणे दिसून आले. भोणे, बिलखेडा, जांभोरा, सार्वे, बांभोरी बु., बोरगाव बु., भवरखेडे, विवरे व बोरगाव खु. येथिल रॅलीत शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने पाटील यांच्या जनाधाराची ताकद स्पष्ट झाली. बैलगाडीत सजविलेल्या रॅलीतून गुलाबभाऊंचे स्वागत आणि समर्थन हा त्यांच्या नेतृत्वावर जनतेचा ठाम विश्वास दर्शवणारा आहे हे पुन्हा सिद्ध झाले.

या प्रसंगी रॉ. काँ. चे जिल्हाध्यक्ष संजय पवार, भाजपाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख शेखर अत्तरदे, संजय पाटील, तालुका प्रमुख डी.ओ. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष नाटेश्वर पवार, तालुकाध्यक्ष शामकांत पाटील, माजी सभापती प्रेमराज बापू पाटील, सुभाष पाटील, प्रेमराज पाटील, रवि चव्हाण, शिवदास पाटील, किशोर पाटील , निंबा पाटील, भदाणे गुरुजी, भैया मराठे सर, दिपक भदाणे, गणेश धिंगाणे, अमोल सोनवणे, रामदास पाटील, शुभम चव्हाण, कल्पनाताई अहिरे, दिनेश पाटील, अरविंद मानकरी, वाल्मीक निंबा कंखरे सोनवणे, मोहन भिल, चंदन भिल, दीपक भिल, मनीष भिल सरपंच बाळू पाटील उषाताई मराठे, हेमंत पाटील, डॉ. संदीप भदाणे,सरपंच उगलाल पाटील, गिरीश पाटील, भूषण महाजन, पिंटू पाटील, दिलीप माळी, मुन्ना पाटील, स्वप्निल पाटील, यांच्यासह भोणे,बिलखेडा, जांभोरा, सार्वे, बांभोरी बु., बोरगाव बु., भवरखेडे, विवरे व बोरगाव खु. येथील महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व अबाल वृद्धांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तरसोदच्या सरपंच पतीसह कार्यकर्त्यांचा सेनेत प्रवेश : हाती घेतला धनुष्यबाण : तरसोद मधून लीड देणार – निलेश पाटील

युवा नेते तथा मा. जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते तरसोद येथिल सरपंच पती निलेश पाटील, माजी ग्रा.पं. सदस्य सारंग कोळी, संतोष कोळी, महेंद्र कोळी, निलेश कोळी, गणेश पाटील, मिलिंद सुरवाडे , सागर कोळी, किरण कुंभार, वासुदेव धनगर, निलेश ठाकरे, तुषार काळे, सागर राजपूत, बब्बू बऱ्हाटे, रोहन राजपूत, धीरज राजपूत, चेतन राजपूत, वासुदेव रा यांनी प्रवेश करून हाती धनुष्यबाण घेताला आहे. गुलाब भाऊंच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहून जास्तीत जास्त लीड तरसोद गावातून दिला जाईल असे निलेश पाटील यांनी सांगितले. या प्रसंगी तरसोद येथील संतोष देवरे, पाळधी येथील प्रकाश धनगर, आबा इंगळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.


 

Tags: #political
Next Post
केळी विकास महामंडळाच्या स्थापनेसाठी रोहिणी खडसे बहुमताने विजयी होणार !

केळी विकास महामंडळाच्या स्थापनेसाठी रोहिणी खडसे बहुमताने विजयी होणार !

ताज्या बातम्या

लव्ह जिहादविरोधी कायदा हिवाळी अधिवेशनात लागू करा: राष्ट्रीय हिंदू संघटनेचे निवेदन!
खान्देश

लव्ह जिहादविरोधी कायदा हिवाळी अधिवेशनात लागू करा: राष्ट्रीय हिंदू संघटनेचे निवेदन!

November 27, 2025
जळगाव जिल्हा परिषदेतर्फे आंतरजातीय विवाह प्रोत्साहन अनुदान २०४ जोडप्यांना वाटप
खान्देश

जळगाव जिल्हा परिषदेतर्फे आंतरजातीय विवाह प्रोत्साहन अनुदान २०४ जोडप्यांना वाटप

November 27, 2025
बॅग लिफ्टिंगचे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात; ८ लाख रुपयांची रोकड जप्त
खान्देश

बॅग लिफ्टिंगचे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात; ८ लाख रुपयांची रोकड जप्त

November 27, 2025
जळगाव विमानतळ विस्ताराला गती; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला भूसंपादन प्रक्रियेचा सविस्तर आढावा
जळगाव जिल्हा

जळगाव विमानतळ विस्ताराला गती; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला भूसंपादन प्रक्रियेचा सविस्तर आढावा

November 27, 2025
एरंडोलचा सर्वांगीण विकास साधला’ – आ. अमोल पाटील
खान्देश

एरंडोलचा सर्वांगीण विकास साधला’ – आ. अमोल पाटील

November 27, 2025
धरणगाव पंचायत समितीचे आरोग्य सेवक मिलिंद लोणारी यांना आंतरराष्ट्रीय ‘कर्मवीर चक्र’ पुरस्कार!
आरोग्य

धरणगाव पंचायत समितीचे आरोग्य सेवक मिलिंद लोणारी यांना आंतरराष्ट्रीय ‘कर्मवीर चक्र’ पुरस्कार!

November 27, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group