• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विजेच्या शाॅक लागून विवाहितेचा मृत्यु

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 6, 2021
in गुन्हे
0
विजेच्या शाॅक लागून विवाहितेचा मृत्यु

अमळनेर, दि. 06 – अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील विवाहिता वैशाली संतोष कोळी (वय-34) यांचा मंगळवारी सकाळी साडे आठ वाजता इलेक्ट्रीक मोटारीच्या साह्याने पाणी भरत असताना विजेच्या धक्का बसलाने मृत्यु झाल्याची घटना घडली.

दरम्यान गावात नळांना पाणी आल्याने वैशाली कोळी यांनी इलेक्ट्रीक मोटार लावत पाणी भरण्याची लगबग सुरू होती. मात्र थोड्या वेळात विजपुरवठा खंडित झाला. यातच वैशाली यांनी पाणी भरून झाल्यानंतर इलेक्ट्रीक मोटरची पिन काढताना अचानक विज पुरवठा पुन्हा सुरु झाला. यातचं त्यांना विजेचा जबर धक्का बसल्याने जागेवरच त्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला.

त्यांना ताबड़तोब अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यु झाला असल्याचे सांगण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात शव विछेदन करून दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

वैशाली यांना एक मुलगी, एक मुलगा असून तिचे पती संतोष कोळी हे येथील पाडळसरे धरणावर इलेट्रीक कारागिर म्हणून कामाला आहे. तिच्या या अपघाती मृत्युने तिच्या मुलांचा व पतीचा आक्रोश मनाला हेलावनारा होता. या तरुण महिलेच्या अचानक घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याघटनेची वार्ता गावात सर्वत्र वाऱ्यासारखी पसरल्याने स्मशान शांतता झाली होती. दरम्यान मारवड पोलीस ठाण्यात अकस्माक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Next Post
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरु 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरु 

ताज्या बातम्या

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
गोदावरी आयएमआर महाविद्यालयात “फ्रेशर्स स्पॉटलाईट २के२६” उत्साहात संपन्न !
जळगाव जिल्हा

गोदावरी आयएमआर महाविद्यालयात “फ्रेशर्स स्पॉटलाईट २के२६” उत्साहात संपन्न !

October 14, 2026
जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी
क्रिडा

जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी

October 14, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड
जळगाव जिल्हा

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश

October 13, 2026
नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात
गुन्हे

नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात

October 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add