• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आ. राजूमामा भोळे एक लाखाच्या मताधिक्याने विजयी होणार.. – ना. गिरीश महाजन

व्यवस्थापनासाठी भाजपकडून १०९ कार्यकर्त्यांची यादी जाहीर

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 25, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
आ. राजूमामा भोळे एक लाखाच्या मताधिक्याने विजयी होणार.. – ना. गिरीश महाजन

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून आ. राजूमामा तथा सुरेश भोळे हे एक लाखाच्या मताधिक्याने विजयी होतील. त्यासाठी कार्यकर्त्यांनी नियोजनात्मक प्रचार करावा असा विश्वास भाजपचे जेष्ठ नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. ते भाजपा व्यवस्थापन समितीची बैठक झाली, त्यावेळी बोलत होते. जळगाव शहर विधानसभा निवडणुकीची १०९ कार्यकर्त्यांची जम्बो यादी यावेळी जाहीर करण्यात आली.

इतर पक्षाच्या तुलनेत भाजपाची संघटनात्मक बैठक झाली. या बैठकीस जळगाव लोकसभेचे प्रभारी व राज्यसभेचे खा. बन्सीलाल गुजर यांच्यासह ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये जळगाव शहर विधानसभेच्या निवडणूक व्यवस्थापन समितीची १०९ कार्यकर्त्यांची जम्बो यादी जाहीर करण्यात आली. याप्रसंगी बन्सीलाल गुजर यांनी विविध समित्यांची सविस्तर माहिती कार्यकर्त्यांना समजून सांगितली. तसेच आपल्याला दिलेले काम योग्य प्रकारे आपण सांभाळून करायचे असे त्यांनी सूचना दिल्या.

याप्रसंगी ना. गिरीश महाजन यांनी, जळगाव शहर विधानसभा निवडणुकीत मागच्या वेळी सुद्धा जळगाव जिल्ह्यात सर्वात जास्त मताधिक्याने आमदार सुरेश भोळे निवडून आले होते असे सांगून त्याच अनुषंगाने यावेळेस देखील जळगाव शहरातून आमदार भोळे यांना एक लाखाच्या मताधिक्याने जळगावची जनता निवडून देईल असे आत्मविश्वासाने कार्यकर्त्यांना सांगितले. सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने पक्षाच्या व महायुतीच्या ऊमेदवाराचा प्रचार करून शासनाच्या व केंद्र सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिले.

या बैठकीत आ. सुरेश भोळे, शहर जिल्हाध्यक्षा उज्वला बेंडाळे, माजी महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, जळगाव लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ. राधेशाम चौधरी, शहर विधानसभा निवडणूक प्रमुख विशाल त्रिपाठी, सरचिटणीस अरविंद देशमुख, महेश जोशी, जितेंद्र मराठे, ज्योती निंभोरे, किशोर ढाके, सुभाष शौचे आदी उपस्थित होते. कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Tags: #political
Next Post
जीवघेण्या वेदनांपासून ११ वर्षीय मुलाला दिलासा

जीवघेण्या वेदनांपासून ११ वर्षीय मुलाला दिलासा

ताज्या बातम्या

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त
गुन्हे

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त

July 18, 2026
डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी
शैक्षणिक

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

July 18, 2026
हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी
आरोग्य

हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

July 18, 2026
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग
शैक्षणिक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 17, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
आरोग्य

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 17, 2026
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद
आरोग्य

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

July 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add